अफवांवर विश्वास ठेवू नका ! जीवात जीव असेपर्यंत कर्मयोगी कारखाना सहकारीच राहणार : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील 

Sep 14, 2025 - 07:10
 0  651
अफवांवर विश्वास ठेवू नका ! जीवात जीव असेपर्यंत कर्मयोगी कारखाना सहकारीच राहणार : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील 

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना ही अर्थकारणातील एक प्रमुख संस्था आहे. या कारखान्याच्या बाबतीत एक नवीन फॉर्मुला आपण अवलंबला आहे. सहकारी संस्था टिकवून त्यामध्ये खाजगी गुंतवणूक आपण आणले आहे. या निर्णयामुळे उद्याच्या गाळपामध्ये शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळतील, कामगारांचा पगार वेळेवर मिळेल सर्व उसाचं गाळप वेळेवर होईल. आणि शेतकऱ्यांना वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात पैसे मिळतील. त्यामुळे कोण काहीही अफवा पेरत असेल तर त्यावरती विश्वास ठेवू नका,आज श्रद्धेय कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या प्रतिमेला साक्ष ठेवून मी सांगतो की जीवा जीव असेपर्यंत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना हा सहकारीच राहील अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात दिली. 

इंदापूर अर्बन बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,इंदापूर तालुक्याचे अर्थकारण प्रामुख्याने तीन संस्थांवरती अवलंबून आहे. एक म्हणजे कर्मयोगी साखर कारखाना दुसरा म्हणजे निराभिमा आणि तिसरा म्हणजे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना होय. या तीन कारखान्यांचा आर्थिक व्यवहार जर बघितला तर तो दीड हजार कोटी पेक्षा जास्त आहे. कर्मयोगी कारखान्यात जे धोरण आपण राबवला आहे त्या संदर्भात माजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.

त्यांना देखील हा फॉर्म्युला पटला. कारखाने बँकेच्या ताब्यात जाणं किंवा भाडेतत्त्वावरती देणं याने प्रश्न सुटत नाहीत. सहकारातल्या संस्था ठेवून जर सहकारात खाजगी गुंतवणूक आणणे हीच चांगली बाब आहे. 

त्यामुळे कर्मयोगी कारखान्याबाबत काही काळजी करू नका.आपल्याकडे चांगल्या गोष्टीपेक्षा गैरसमज जास्त पसरवले जातात. पण सत्य हे सत्यच असतं,जीवात जीव असेपर्यंत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना हा सहकारीच राहणार, त्याचं नाव कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना हेच राहणार आहे.

सभासदांच्या ठेवी सभासदांच्या राहणार आहेत जेवढे सभासद आहेत ते सर्व सभासद राहणार आहेत आणि जेवढे कायम कामगार आहेत ते देखील कायम राहणार आहेत. महिन्याची महिन्याला संचालक मंडळाची बैठक पार पाडणार आहे आणि वार्षिक सभा देखील कारखान्याचे संचालक मंडळच घेणार आहे.असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

गेल्या 11 वर्षापासून मी कुठल्याही राजकीय पदावर नाही,पण अस असताना 10 वर्षे 1000 कोटीची संस्था चालवणं सोप नाही. आज मी सकाळी कारखाना परिसरात गेलो होतो त्यावेळी पाहणी केली असता सर्व कामे व्यवस्थित चालली आहेत.कर्मयोगी साखर कारखाना अतिशय चांगला चालणार.कारखाने चांगले चालले तर तर त्याचा आर्थिक फायदा ही बँकेला होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow