उजनी 108 टक्क्याहून अधिक भरली ! उजनीतून भीमा पात्रात 25 हजार क्युसेकने विसर्ग सुरू

Sep 14, 2025 - 07:00
 0  218
उजनी 108 टक्क्याहून अधिक भरली ! उजनीतून भीमा पात्रात 25 हजार क्युसेकने विसर्ग सुरू

आय मिरर 

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रात 25 हजार क्युसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर उजनी धरण प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उजनी धरणात सध्या एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 121 पूर्णांक 68 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे उजनी धरण 108 टक्क्या पेक्षा अधिक क्षमतेने भरला आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग केला जातोय.

काल शनिवारी रात्री सात वाजल्यापासून भीमा नदी पात्रात सुरू असणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये हळूहळू वाढ करण्यास सुरुवात झाली. रात्रीस सात वाजता पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता त्यानंतर त्यामध्ये वाढ करून मध्यरात्री दीड वाजता तो पंचवीस हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे.

उजनी धरण साखळीतील वरील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आल्यामुळे उजनी धरण व्यवस्थापनाने देखील भीमा नदी पात्रात हळूहळू पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला होता. मात्र पावसाची परिस्थिती पाहता शनिवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजल्यापासून त्यामध्ये वाढ करण्यास सुरुवात करण्यात आली.

शनिवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता तो  5 हजार क्युसेक इतका करण्यात आला पुढे त्यामध्ये रात्री साडेनऊ वाजता वाढ करून तो 15000 क्युसेक करण्यात आला त्यानंतर मध्यरात्री दीड वाजल्यापासून यामध्ये वाढ करून तो 25 हजार सहाशे क्युसेक इतका करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow