शहा गावातील शंभू महादेवाला 200 दाम्पत्यांनी वाहिला सामूहिक बेल, तर उद्या होणार अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील शहा गावातील शंभू महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं 200 दांपत्याच्या हस्ते शंभू महादेवाला बेल पान अर्पण करण्यात आला.अत्यंत जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची पंचक्रोशीत ख्याती आहे.काशीखंड ग्रंथामध्ये देखील या मंदिराची महती सांगितले ची माहिती शहा ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप पाटील यांनी दिली.
तर प्रत्येक महाशिवरात्रीला इंदापुरातून सिद्धेश्वराची पालखी शहा गावी शंभू महादेवाच्या भेटीसाठी येत असते. या ठिकाणी शंभू महादेव आणि सिद्धेश्वराची भेट होते. यंदा देखील ही पालखी भक्तीमय वातावरणात या ठिकाणी भेटीसाठी दाखल झाली आणि शहा ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात तिचं स्वागत करण्यात आलं.
शहा गावातील श्री शंभू महादेव हे जागृत देवस्थान देवस्थान असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी होती. तर जवळपास 200 दांपत्यांनी जोडीने या ठिकाणी शंभू महादेवाची विधिवत पूजा करीत बेल पानाचा अर्पण केलं.
प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा आयोजन केलं जातं. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडत. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार लालचंद महाराज चोपडे यांचे कीर्तन सेवा होणार आहे तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रघुराज महाराजांचे वंशज प्रसिद्ध कीर्तनकार निखिल महाराज निंबाळकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती दिलीप पाटील यांनी दिली.
What's Your Reaction?






