खोरोचीतील उत्तम जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू, गुरुवारी झाले होते धारदार शास्त्राने वार

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील उत्तम जालिंदर जाधव यांच्यावर काल गुरुवारी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यामध्ये उत्तम जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारा दरम्यान उत्तम जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांनी दिली आहे.
उत्तम जाधव हे इंदापूर तालुक्यातील खोरोची गावचे रहिवासी असून इंदापूर तालुक्यातील निमसाखर परिसरात त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. याप्रकरणी इंदापूर पोलिसात आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदापूर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल आहे.
तर उर्वरित सात आरोपींचा शोध इंदापूर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
या प्रकरणात आणखीही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे हा आला नेमका कोणत्या कारणातून झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
What's Your Reaction?






