त्या घटनेतील आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी ! इंदापूर न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल : वाचा काय आहे प्रकरण...

Oct 15, 2025 - 15:09
Oct 15, 2025 - 16:49
 0  4618
त्या घटनेतील आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी ! इंदापूर न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल : वाचा काय आहे प्रकरण...

आय मिरर 

बातमी आहे पुण्याच्या इंदापुरातून,2016 साली अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेल्या प्रकरणातील आरोपीला इंदापूर येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.सागर भिमराव शेलार रा.भिगवण ता.इंदापूर असं शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात इंदापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी खटला सुरू होता. 14 ऑक्टोंबर 2025 रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यु एम मुधोळकर यांनी घोषित केला. यात आरोपीला 5 वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी यासंदर्भात न्यायालयासमोर युक्तिवाद केला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरत इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यु एम मुधोळकर यांनी आरोपी सागर भिमराव शेलार यास पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंड अशी शिक्षा ठोठावली.जवळपास नऊ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. 

काय आहे प्रकरण...

30 नोव्हेंबर 2016 साली ही घटना घडली होती.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी सागर शेलार हा शाळेच्या गेट समोर आला. त्या ठिकाणी त्याने त्या पिढीतेशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलगी घाबरली आणि ते पुढे जाऊ लागली. यावेळी आरोपीने मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणा तिच्या पाठीमागून येऊन पीडितेचा उजवा हात मागे ओढला.

त्यावेळी पीडित मुलगी घाबरली आणि ती रडू लागली. आरोपीने पीडित मुलीच्या गळ्याला हात लावून तिला ढकलून देत तिच्याशी अश्लील भाषेत वर्तन केले. घटनास्थळी लोक आल्याने आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेला. 

यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सागर शेलार याच्या विरोधा विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास भिगवण येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एम. राठोड यांनी केला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सदरचा खटल्याची सुनावणी प्रथम बारामती येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यासमोर व नंतर इंदापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचेसमोर झाली. सदर प्रकरण सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी न्यायालयासमोर पीडितेच्या बाजूने युक्तिवाद केला.इंदापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात जवळपास नऊ वर्षे हा खटला चालला.दि.14 ऑक्टोंबर 2025 रोजी इंदापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. 

यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यु एम मुधोळकर यांनी आरोपीस दोषी ठरवत 5 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. तसेच पोस्को कलम 8 मध्ये 5 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड आणि दंड न भरलेस सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. तर पोस्को कलम 12 मध्ये 3 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड.दंड न भरलेस तीन महिने सश्रम कारावास शिक्षा दिली आहे. ही सर्व शिक्षा एकत्र भोगायची आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow