त्याला शेटफळ हवेली पाटीवर पिस्टल विक्री करायची होती,पण इंदापूर पोलिसांनी…
आय मिरर
पिस्टल आणि जिवंत काडतूस विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या एकाला इंदापूर पोलिसांनी शेटफळ हवेली मधून ताब्यात घेतलंय. स्वप्नील नवनाथ नाईकनवरे वय २५ वर्ष असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नांव आहे.गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे.इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.07 डिसेंबर रोजी सकाळी पो.कॉ.गणेश डेरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इंदापूर तालुक्यातील शेटफळहवेली पाटी येथे एक इसम पिस्तुल विक्री करणेसाठी येणार आहे.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सगा.पो.नि.मोहीते व सहा.पो. फौजदार प्रकाश माने,पो.हवा.सलमान खान,पो.कॉ.गणेश डेरे,पो.कॉ.अंकुश माने, यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावून छापा घालून संबंधित व्यक्तीला पिस्तुल आणी एक जिवंत काडतुसा सह ताब्यात घेतले.
त्याच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये आर्म अँक्ट कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हवा खान हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पो.अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,पो निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
What's Your Reaction?