'पण मामा इतका सोपा नाही' पुण्याच्या इंदापुरात मंत्री भरणे नेमकं काय म्हणाले ; वाचा सविस्तर

आय मिरर
मी चालताना देखील संबंध ठेवतो इतका मामा सोपा नाही.मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला. जनतेचे प्रेम गाड्या घोड्या आणि स्टंट वरती नसतं तुम्ही लोकांमध्ये किती जाता, त्यांना किती मदत करता यावर जनता प्रेम देते. इंदापूरची लोक बोलत नाहीत याचा अर्थ लोकांना कळत नाही असं नाही.इंदापूरची जनता खूप हुशार आहे. असं म्हणत नाव न घेता राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.
पुण्याच्या इंदापूर मध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणुसकीचा स्नेह मेळावा पार पडलाय.यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठान लोढा परिवार व जैन संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी मंत्री भरणे बोलत होते.
कर्मयोगी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत रविवारी दि.23 मार्च 25 रोजी इंदापुरातील शहा सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला.
भरणे पुढे म्हणाले की,युवा क्रांती प्रतिष्ठान लोढा परिवार आणि जैन संघटनेच्या माध्यमातून खूप चांगले काम होत आहे,त्याचं मी कौतुक करतो. हे काम एकदिवसापुरते नाही तर वर्षभर हे काम सुरू असते.लोढा कुटुंबातील काही बंधू पुण्यात राहतात.मला शेठ लोकांची माहिती अलीकडे जास्त ठेवावी लागते.
लोढा परिवार मोठा करण्यात त्यांच्या बहिणीचा खूप मोठा वाटा आहे. ज्यांनी वर्षभर मदत केली त्यांना आज गौरवण्यात आले. पण ज्यांना सन्मानीत केलं त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. गरजवंताला आपण मदत केली पाहिजे.यासाठी युवा क्रांती प्रतिष्ठान लोढा परिवार आणि जैन संघटना काम करते.
मी रुग्णांना जेवढी मदत करता येईल तेवढा प्रयत्न करतो. अनेकांना मी रुग्णालयात भेटायला जातो. त्यावेळी रुग्णालयाच्या बाहेर सोन्याचं किडुक मिडुक मोडून बहिण भावाला मदत करत असते.त्यामुळे बहिणीचे नातं खूप वेगळं असत. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या असे आवाहन त्यांनी केले.
पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले की,आज सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. आज नक्षलवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. आज प्रत्येकाने जागृत राहण्याची गरज आहे जर जागृत नसेल तर सामाजिक विषमता फोफावत होत जाईल.माणूस हा समाजशील प्राणी आहे. मग एवढं सगळं असताना माणुसकी लोप पावत चालले आहे हा मोठा प्रश्न आहे. आपण आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ते करत असताना माणुसकी जपली पाहिजे. कोणत्याही सामाजिक उपक्रमात शहा परिवाराचे योगदान असते हाच खरा माणुसकीचा स्नेह मेळावा असल्याचे प्रतिपादन कोकणे यांनी यावेळी केले.
दरम्यान यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे जयंत नायकुडे,संतोष देशमुख,सचिन बोगावत आदींसह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.तर सूत्रसंचलन माजी नगरसेवक प्रशांत सीताप व संतोष नरुटे यांनी केले तर आभार धरमचंद लोढा यांनी मानले.
यावेळी अरविंद वाघ,नरेंद्र गांधी,शिवाजी मखरे,संदीपान कळवळे, रमेश शिंदे,रचना परिवाराचे प्रमुख रज्जाक भाई पठाण,हमीद आतार,सीमा कल्याणकर,निलोफर पठाण,राजश्री मखरे, यांसह जैन संघटनेचे पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते,युवा क्रांती प्रतिष्ठानचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व लोढा परिवाराचे सर्व सदस्य नातलग उपस्थित होते.
What's Your Reaction?






