यवत पोलीस ठाण्याने तीन लाख रुपयांचे हरवलेले मोबाईल तक्रारदारांना केले परत 

Mar 22, 2025 - 11:45
 0  627
यवत पोलीस ठाण्याने तीन लाख रुपयांचे हरवलेले मोबाईल तक्रारदारांना केले परत 

आय मिरर

यवत पोलीस ठाण्याने तीन लाख रुपये किमतीचे हरवलेले मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत केले आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि यवत चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत केलेत. किमती मोलाचे मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी यवत पोलिसांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

यवत पोलीस स्टेषन हददीमधील विविध तका्ररार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झालेबाबत यवत पोलीस स्टेषन येथे तक्रारी दाखल केल्या होत्या. सदर तक्रारीची दखल घेवुन गहाळ मोबाईलचा शोध घेवुन ते हस्तगत करणेबाबतचे आदेष पोलीस निरीक्षक नारायण देषमुख यांनी पोलीस अंमलदार मारूती बाराते व यवत गुन्हे शोध पथकास दिले होते. त्यावरून गहाळ मोबाईल बाबत अधिकची माहिती घेवुन विविध भागातुन 21 मोबाईल हस्तगत केले व ते तक्रारदार यांना सपुर्त केले. 

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देषमुख,अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्षनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, पो.हवा गुरूनाथ गायकवाड, पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. संदीप देवकर, पो.हवा.रामदास जगताप, पो.हवा. अक्षय यादव, पो.हवा दत्ता काळे, पो.हवा. विकास कापरे, पो.कॉ.मारूती बाराते, पो.कॉ. प्रतिक गरूड यांचे पथकाने किली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow