भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीर

Oct 3, 2023 - 15:40
 0  981
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीर

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने येथील कला महाविदयालयांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण व परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीरास प्रतिसाद दिला.भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, माजी सरपंच पराग जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती संजय देहाडे, अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, तुषार खराडे, अभिजीत देवकाते, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक संजय जगताप, संपत बंडगर, तेजस देवकाते, अभिमन्यु खटके, प्रशांत वाघ, सुनिल वाघ, सुनिल काळे, सतीश काळे, विश्वास देवकाते, सुर्यकांत सवाणे, कपील भाकरे, गुराप्पा पवार, डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.  

यावेळी बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, युवकांना रोजगार व नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमातुन विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.सेवा पंधरवाड्या निमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले तर आभार डॉ. राजाराम गावडे यांनी केले. रक्तदान शिबीरासाठी पुणे यथील अक्षय ब्लड बॅंक तसेच कला महाविदयालय, भिगवण येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow