वीर कुटुंबाचा प्रवास युवा व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
आय मिरर
वीर कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास हा अत्यंत खडतर झाला आहे.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी व्यवसायातून आपली वेगळी उंची निर्माण केली असून एखाद्या व्यवसायात जर जीव ओतून काम केले तर त्यात किती मोठी उंची गाठता येते हे देविदास वीर आणि सुरज वीर या बापलेकांकडे पहिल्या नंतर अनुभवता येते त्यांचा हा आदर्श तरुण व्यावसायिकांना प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
रविवारी 12 ऑक्टोबर रोजी इंदापूर शहरातील बाबा चौकात नव्याने निर्माण केलेल्या विवो एक्सक्लूसिव स्टोअर चे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भरणे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मंत्री भरणे म्हणाले की, कोणताही व्यवसाय करताना त्यामध्ये जिद्द आणि चिकाटी ही अत्यंत महत्त्वाची असते. वीर परिवाराकडे मुबलक शेती आहे आपली शेती देखील ते व्यवसाय म्हणून करतात. त्यांच्या शेतीत डाळिंब केळी यासारखी विविध फळ पिके त्यांनी घेतली आहेत. ते उत्तम शेतकरी असले तरी उत्तम व्यावसायिक म्हणून देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुरुवातीच्या काळात हॉटेल व्यवसायापासून त्यांनी सुरुवात केली. दहा पंधरा वर्षे त्यामध्ये घालवल्यानंतर कोरोना कालावधीत अनेकांना आपल्या व्यवसायामध्ये टर्निंग पॉईंट घ्यावा लागला. यातूनच त्यांनी इंदापूर बस स्थानकामध्ये सुरज मोबाईल शॉपी सुरू केली.
या पहिल्या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याने त्यांना व्यवसायात प्रगती साधता आली. आज इंदापूर बदलत आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या इंदापूरचं नाव राज्यात कसं उंचवलं जाईल यासाठी मी कसोशीने प्रयत्न करतोय. इंदापूर शहरातील प्रत्येक व्यावसायिकाला पुढे कसे आणता येईल त्या दृष्टीने इंदापूर शहरात बदल घडवत आहे. त्यातूनच उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागले आहेत. भविष्यात देखील शिरसोडीचा ब्रिज झाल्यामुळे इंदापूर मधील व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने नावारूपाला येतील. इंदापूरच्या बाजारपेठेला त्याचा नक्की फायदा होईल.
कोणताही व्यवसाय करताना निर्णय क्षमता ही खूप महत्त्वाची असते. विवो कंपनीचे हे एक्सक्लुसिव्ह स्टोअर आपल्याकडे चालेल की नाही त्यामध्ये किती यश येईल याचा विचार न करता या व्यवसायात आपण जिंकायचं आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवायचं याची खूणगाट मनाशी बांधून देविदास वीर आणि सुरज वीर या दोघा बाप लेकाने ठोस निर्णय घेतला. म्हणून आज हे दालन आपल्या इंदापूर शहरात उभे राहिले आहे याचा मनस्वी आनंद आहे. यामुळे इंदापूर शहराची ओळख नक्की बदलली जाईल. जे स्वप्न घेऊन वीर कुटुंब या व्यवसायात उतरले आहे मला विश्वास आहे की जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आणि ग्राहकांच्या सहकार्याने त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.
माझा वीर कुटुंबाला सल्ला राहील की व्यवसाय करताना तो पारदर्शकपणे करा आणि विशेष म्हणजे तो उधारी वरती करू नका. भले दोन रुपये नफा कमी राहील पण कोणताही धंदा रोखीत केला तर तो अधिक फायद्याचा राहतो. त्यामुळे नातेसंबंध जपण्यापेक्षा व्यवसायातील सेवेला आणि प्रामाणिकपणाला अधिक महत्त्व द्या. ग्राहकांचे हित जोपासा. ग्राहक हे तुमच्या व्यवसायातील तुमचे दैवत आहेत आणि ग्राहक हा राजा असतो.जर त्याला आपण योग्य सेवा दिली तर तो कधीही आपल्याला विसरत नाही हे सांगायलाही मंत्री भरणे विसरले नाहीत.
या दालनास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,सोनाईचे प्रमुख दशरथ माने,भाजपाचे नेते प्रवीण माने,माजी उपसभापती नारायण वीर,राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते ॲडव्होकेट राहुल मखरे,युवा नेते दीपक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,प्रशांत उंबरे,पोपट शिंदे,अनिल पवार यांसह अनेकांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
What's Your Reaction?