इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडतीत 'कही खुशी कही गम' काहींच्या पदरी निराशा तर काहींना लॉटरी

Oct 13, 2025 - 13:20
Oct 13, 2025 - 13:20
 0  2356
इंदापूर पंचायत समिती आरक्षण सोडतीत 'कही खुशी कही गम' काहींच्या पदरी निराशा तर काहींना लॉटरी

आय मिरर 

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत इंदापूर पंचायत समिती मधील 16 गणांकरिता आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.इंदापूर मधील राधिका रेसिडेन्सी क्लब मध्ये दुपारी बाराच्या सुमारास ही सोडत पार पडली.ईश्वर चिठ्ठी द्वारे संस्कृती अजय गायकवाड या शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली.

या आरक्षण सोडतीत निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या काहींच्या पदरी निराशा आली तर काहींना आता अचानक लॉटरी लागणार आहे.जवळपास गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुका रखडल्या होत्या.

आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अनेकांनी मैदानात संपर्क वाढवला होता. वेगवेगळ्या गणांमधून अनेक जण पंचायत समितीच्या करिता इच्छुक होते आणि तयारीला देखील लागले होते. मात्र आजच्या स्मृतीमुळे काहींच्या पदरी निराशा पडली तर काहींना अचानक लॉटरी लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निरीक्षण अधिकारी विठ्ठल उदमले,(उपजिल्हाधिकारी भूसंपादन), इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसुडे,गटविकास अधिकारी सचिन खुडे, नायब तहसीलदार विजय घुगे,अविनाश डोईफोडे,स्वाती राऊत या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. यावेळी जे एस माने,दीपक पवार,अजय गायकवाड या कर्मचाऱ्यांचे ही सहकार्य लाभले.

असं असेल आरक्षण...

सर्वसाधारण महिला आरक्षण :  

भिगवण गण (131)

पळसदेव गण (133)

माळवाडी गण (135)

वडापुरी गण (136 ) 

नागरिकांचा मागास प्रवर्ग : 

बिजवडी (134), 

निमगाव केतकी ( 137)

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : 

बावडा गण (145) 

लाखेवाडी (144)

सर्वसाधारण आरक्षण : 

शेटफळगडे गण (132)

शेळगाव गण (138)

बोरी गण (139)

काटी गण(143)

लुमेवाडी गण (146)

अनुसूचित जाती महिला प्रवर्ग : 

वालचंदनगर गण (140)

लासुर्णे गण (141)

सणसर गण (142) 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow