सरडेवाडीच्या पोरांनी नांव कमावलं ! गावान जाहिर नागरी सत्कार करीत कौतुक केलं 

Sep 17, 2023 - 21:26
Sep 17, 2023 - 21:52
 0  1262
सरडेवाडीच्या पोरांनी नांव कमावलं ! गावान जाहिर नागरी सत्कार करीत कौतुक केलं 

आय मिरर

सरडेवाडी गावातील अमित किसन शिताफ याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत कर सहायक पदी निवड झाली आहे तर रोहित राजेंद्र सरडे याची आय टी क्षेत्रात नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर म्हणून निवड झाली आहे.या दोघांनी गावाचं नांव उज्ज्वल केलं असून या दोघांचाही सरडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सरडेवाडी गावचे सरपंच सिताराम जानकर म्हणाले की,नोकरी लागण्यासाठी एकमेव (MPSC )महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC क्षेत्र असे आहे की, तेथे वशीला चालत नाही .या क्षेत्रात कष्ट, प्रामाणिकपणा व साचोटी च्या जोरावर नोकरी मिळते.तसेच नोकरी करत असताना आई वडिलांना,मित्र परिवार ,नातेवाईक व गावाला विसरू नका असे सांगितले.

यावेळी संताराम ढावरे यांनी प्रस्ताविक केले व इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत शिताफ यांनी आभार मानले.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत सरडे,मा.सरपंच सचिन सरडे,मा.उप सरपंच हनुमंत जमदाडे,पं. समिती चे भारत ढावरे,भारत माळी, पशुसंवर्धन अधिकारी अनिल ठवरे,विठ्ठल महाराज शिंदे तसेच तरुण वर्ग ,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow