दुधाच्या दरासाठी इंदापूरात शिवधर्म फाऊंडेशनचे आमरण उपोषण

Dec 4, 2023 - 20:44
 0  493
दुधाच्या दरासाठी इंदापूरात शिवधर्म फाऊंडेशनचे आमरण उपोषण

आय मिरर

इंदापूरात शिवधर्म फाउंडेशन कडून दुधाला दर मिळावा शासनाने पारीत केलेल्या अद्यादेशानुसार ३४ रुपये दरापेक्षा कमी दराने दुध खरेदी करु नये या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालयावर इंदापूर नगर परिषदेपासून दूध उत्पादकांसह जनावरांसोबत मोर्चा काढण्यात आलाय.तर इंदापूर तहसील कार्यालयासमोर शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आणि माऊली वनवे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

सोमवारी इंदापूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक घालून या आंदोलनाची सुरवात करण्यात आली. "सहन नाही होत आता माझ्या धन्याची पिळवणूक, शेतकऱ्यांना न्या द्या माझ्या दुधाला भाव द्या "असे फलक जनावरांच्या पाठीवर लावण्यात आले होते. 

काय आहेत मागण्या? 

१) ३.२ फॅट व ८.२एसएन एफ. 34 रुपये भाव मिळावा.

२) पशुखाद्याचे भाव २५% टक्के कमी करण्यात यावे.

३) सर्व सहकारी व खाजगी दुध संस्था यांचे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दर महा आलेल्या दुधाचे ऑडिट करून कोणाचे संकलन किती आहे. व दुध पिशवी प्रोडक्ट यांची विक्री किती आहे. यांची दरमहा माहिती सार्वजनिक जाहीर करण्यात यावी.

४) ज्या खाजगी व सहकारी संस्थानी गेल्या तीन महिन्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भाव दिला आहे. अशा सर्व संस्थावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५) पशु औषधे खाद्य व GST मधून मुक्त करण्यात यावी.

६) दुधाच्या संदर्भात सरकार व नेते यांच्या मध्ये होणार या प्रत्येक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे.

७)जनावरास विमा कवच योजना उपलब्ध करून प्रत्येक गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरु करावे.या मागण्या आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow