इंदापूर मराठा मेडिकोज असोसिएशनने दर्शवला इंदापूरातील आमरण उपोषणास पाठिंबा

Nov 1, 2023 - 20:48
Nov 1, 2023 - 20:50
 0  327
इंदापूर मराठा मेडिकोज असोसिएशनने दर्शवला इंदापूरातील आमरण उपोषणास पाठिंबा

आय मिरर

इंदापूर मराठा मेडिकोज असोसिएशन कडून इंदापूरातील तहसिल कार्यालयासमोर सुरु असणा-या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.बुधवारी दि.०१ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील इंदापूर मराठा मेडिकोज असोसिएशनच्या सदस्य डाॅक्टरांनी एकत्र येत इंदापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण स्थळी दाखल होत आपला पाठिंबा दर्शवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.

यावेळी डाॅ.पंकज गोरे म्हणाले की, आज मराठा समाज बांधव उपोषणाला बसले आहेत आम्ही सर्वजण या अन्यायातून पुढे गेलेलो आहोत. 95 ते 98 टक्के मार्क पाडून देखील जेव्हा आपल्याला प्रवेश मिळत नाही आणि कमी गुण असणारे लोक आरक्षणाच्या जोरावर आव्हानात्मक असणाऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळवतात. याचा फटका आमच्यासारख्या सह इतर लोकांना बसत आहे. त्यामुळे इंदापूर तहसील कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या आमरण उपोषणाला आम्ही पाठिंबा दर्शवला आहे.

तर डाॅ.अनिल शिर्के म्हणाले कि, इंदापूर तहसील कार्यालयासमोर माजी सैनिक महादेव सोमवंशी आश्रम फडतरे आणि रोहित पाटील हे तिघे आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. गेल्या 40 वर्षापासून सुरू असलेला आरक्षणाचा लढा पुढे काही जात नाही. आपण आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले. बऱ्याच गोष्टी मांडल्या जातात परंतु त्याला मूर्तरूप काही मिळत नाही. तो योग लवकरात लवकर यावा. मी व माझ्यासारखे अनेक जण शिक्षण घेत असताना या सामाजिक विषमतेला बळी पडलेले आहेत. विषमता आता तरी दूर झाली पाहिजे. आमची मुलं असतील त्यांना आम्ही ज्या गोष्टींचा सामना केला त्याचा सामना पुढे करावा लागू नये. सरकारने लवकरात लवकर या आरक्षणाला हिरवा कंदील दाखवावा यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

तर डाॅ.समिर मगर म्हणाले की, इंदापूर तहसील कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आम्ही या पाठिंबातून केला आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काची सोळा टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी या मराठा आरक्षणाच्या साठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचे आम्ही समर्थन करतो. हे सरकार लवकरात लवकर आरक्षण देईल आणि सरकारला ते द्यावेच लागेल. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आम्ही चालूच ठेवू.

दरम्यान डाॅ.राणी आरकिले यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अभिजीत ठोंबरे ,डॉ. लक्ष्मण सपकळ ,डॉ. सचिन बाबर ,डॉ. अरविंद अरकिले ,डॉ. अमित देवकर ,डॉ. मनोज शिंदे ,डॉ. पंकज गोरे ,डॉ. शिवाजीराव खबाले ,डॉ. शैलेश घोगरे ,डॉ. धीरज शिंगटे,डॉ. रणजीत कोरडकर ,डॉ. देविदास बोंगाणे ,डॉ. उदर उदय फडतरे ,डॉ. सुधीर तांबिले ,डॉ. सुरज तांबिले, डॉ.गायत्री शिर्के ,डॉ. गीता मगर ,डॉ. अश्विनी ठोंबरे ,डॉ. सुषमा सपकळ ,डॉ. मनीषा बाबर ,डॉ. राणी अरकिले ,डॉ. प्राची देवकर ,डॉ. श्वेता शिंदे ,डॉ. वैशाली गोरे ,डॉ. दिपाली खबाले ,डॉ. सत्यवती घोगरे ,डॉ. विशाखा शिंगटे ,डॉ. रूपाली कोरडकर ,डॉ. आरती फडतरे यांसह रवी चव्हाण, संतोष मोकळे आदींनी यात सहभाग नोंदवत आमरण उपोषणास आपले समर्थन दर्शवले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow