यंदाच्या जिजाऊ भूषण पुरस्कारच्या मानकरी ठरल्या भिगवणच्या जया साखरे

Feb 17, 2024 - 08:33
Feb 17, 2024 - 08:34
 0  158
यंदाच्या जिजाऊ भूषण पुरस्कारच्या मानकरी ठरल्या भिगवणच्या जया साखरे

आय मिरर(देवा राखुंडे)     

मराठा महासंघ भिगवण शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त दरवर्षी देण्यात येणारा 'जिजाऊ भूषण पुरस्कार' भिगवण येथील जया नितीन साखरे यांना प्रदान करण्यात आला. महासंघाच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमाले प्रसंगी पुणे येथील सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व पुनर्वसन केंद्राच्या अध्यक्ष ममतादीदी सिंधुताई सपकाळ व मराठा महासंघाच्या सर्व महिला कार्यकर्त्या यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. 

याप्रसंगी बारामती येथील वैद्यकीय सल्लागार. डॉ कीर्ती पवार, मराठा महासंघाच्या महिला संघटक कविता कांचन या उपस्थित होत्या. अगदी तारुण्यामध्ये पतीला आलेले अपंगत्व व त्यामुळे होत असलेली कुटुंबाची हेळसांड अशा संघर्षमय जीवनाची वाटचाल करीत सौ. जया आपल्या संसाराचा गाडा पुढे रेटत आहेत.त्यांच्या या कर्तुत्वाला सलाम म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आल्याचं अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष एँडवोकेट पांडुरंग जगताप यांनी सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow