शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत कधी? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितली डेडलाईन 

Sep 21, 2025 - 15:20
Sep 21, 2025 - 16:19
 0  509
शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत कधी? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितली डेडलाईन 

आय मिरर 

राज्यात गेल्या चार महिन्यापासून पावसानं धुमाकूळ घातला असून यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले मात्र अद्याप पर्यंत काही शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळालेले नसताना सध्याही राज्याच्या विविध भागात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे याचे पंचनामे सुरू आहेत मात्र दीपावलीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मध्ये म्हटलं आहे. 

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी 21 सप्टेंबर रोजी स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचे उद्घाटन पार पडले याप्रसंगी मंत्री भरणे बोलत होते.

मंत्री भरणे म्हणाले की, नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत मिळणार आहे. पावसामुळे राज्यात सर्वात जास्त नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं आहे.तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडला आहे. या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत. पंचनामा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र त्यात अडचणी येत आहेत. तरीही सर्व पंचनामे लवकरात लवकर करू आणि दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, आणि सरकारी नियमाप्रमाणे त्यांना मदत केली जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली. 

राज्यात मोठी अतिवृष्टी झाली आहे यात शेतकऱ्यांची अजिबात चूक नाही. हे निसर्गाचे संकट आहे.वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पाऊस पडत आहे.त्यामुळे नद्या नाल्यांना पूर येत आहे.याचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे.64 ला 55 हजार एकर क्षेत्राला राज्यात पावसाचा फटका बसला आहे. मे चा शेवटच्या आठवड्यात ते आज पर्यंत काही पिकांचा पाऊस थांबायचा नाव घेत नाही. राज्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठे नुकसान झालं आहे. 

या महिन्यात सर्वात जास्त नुकसान बीड जिल्ह्यामध्ये झाले.या महिन्यात बीड जिल्ह्यात सहा लाख एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगरचे नुकसान झाले आहेत.काही ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे. ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाला आहे त्यांच्या शेतीच्या पिकाचे पंचनामे केले जातील, ज्याची जमिनीची माती वाहून गेली आहे पशुधन असेल किंवा जे काही फळबागाच नुकसान असेल त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिले आहेत.पावसामुळे काही ठिकाणी अडचण येत आहे. शासनाच्या वतीने नुकसान भरपाई दिली जाईल.अपूर्ण पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधकांकडून राज्यात ओल्या दुष्काळाची मागणी केली जात असून यावरही भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.याबाबतीत काही अटी आहेत नियम आहेत त्यास अधिक राहून या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.

तर कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार असं प्रसारमाध्यमांनी भरणे यांना विचारले असता भरणे म्हणाले की,शेतकरी आज खूप अडचणीत आहे. कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी कधी गारपीट होत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं काही ना काही त्यांना आर्थिक पाठबळ देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे ज्येष्ठ आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भिगवण येथील प्रलंबित असणाऱ्या पोलीस ठाणे इमारत आणि ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण ताकतीने सुरू करण्यासंदर्भात बोलताना मंत्री भरणे म्हणाले की,कोणतीही इमारत बांधताना आरोग्याचे मनुष्यबळ आपण तिथे दिले आहे. आवश्यक असणार फर्निचर चे काम चालू आहे. भिगवन ट्रॉमा केअर आणि भिगवण पोलीस ठाण्याची इमारत लवकर मार्गी लावण्याच काम करू.मागील पंधरा दिवसापूर्वी कोट्यावधी रुपये निधी आपण या ठिकाणी दिला आहे.बस स्थानकाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे बस स्थानक देखील वाढवत आहोत. अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण दीपावलीच्यापूर्वी त्या कामाला सुरुवात करत आहोत. 

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं...

गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या वरती बोलताना खालच्या पातळीवरती टीका केली यावरही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केलं आहे.कोणीही असुद्या कोणी कोणावरती वैयक्तिक टीका राजकारणात करू नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं. मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी याबाबत खुलासा केला असल्याचं त्यांनी म्हटलं.

करो रोहित पवार यांच्या आमसभेवरतीही मंत्री भरणे यांनी वक्तव्य केले आहे.मी काल अकोला वाशिम हिंगोली नांदेड दौऱ्याच्या दौऱ्यावर होतो. अधिकारी असतो कामकाज करताना थोडं होत असेल,मी ते जास्त ऐकलेलं नाही.पण एखादा अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow