2029 ला सुनेत्रा पवारांनी 'महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं' जय पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

May 7, 2026 - 18:39
May 7, 2026 - 18:59
 0  72
2029 ला सुनेत्रा पवारांनी 'महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं' जय पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

आय मिरर 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते जय पवार यांनी आज बारामती मध्ये एक विधान केलं आहे. जय पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यात. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची सर्वच बारामतीकरांची इच्छा होती असं जय पवार यांनी म्हटलं.आता  सुनेत्रा वहिनी पण तशा खूप कष्ट घेत आहेत. मला वाटतं २०२९ ला बारामती मधून वहिनीच उभा राहतील आणि आमच्या सर्वांची आशा आहे कि ती जागा वहिनींनी मुख्यमंत्री म्हणून तिथे घ्यायला पाहिजे असं  जय पवार यांनी म्हटल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्यात. 

गेल्या काही दिवसांपासून बारामती मध्ये 2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल अशा चर्चा रंगल्या आहेत. यात प्रामुख्याने अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार आणि अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होईल अशा चर्चांनी जोर धरलाय. तर काही अंशी पार्थ पवार देखील बारामती मधून निवडणूक लढवतील असाही कायास लावला जातोय. 

या सर्व घडामोडींवर दोन दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांना प्रसार माध्यमांनी विचारलं असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.जो कोण चांगलं काम करेल ज्या पद्धतीने बारामतीकरांशी संवाद साधेल वेळ देईल बारामतीकर त्या व्यक्तीला निवडतील, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.2029 साठी आणखीन तीन साडेतीन वर्षांचा काळ आहे सर्वांना त्यांचं कर्तुत्व सिद्ध करू दे,बारामतीकर खूप हुशार आहेत 2029 च्या निवडणुकीला ते ठरवतील असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं.

योगेंद्र पवार यांच्या या प्रतिक्रियेवर आज प्रसारमाध्यमांनी जय पवार यांना त्यांचे मत विचारलं.  2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल का ? असं जय पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा जय पवार यांनी म्हटलं की, युगेंद्र पवार यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं योग्य वाटत नाही. काही दिवसापूर्वी आमची चर्चा झाली.सर्वच बारामतीकारांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं.आता वहिनी पण तशा कष्ट घेत आहेत.2029 ला वहिनीच उभा राहतील आमच्या सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनींनी मुख्यमंत्री बनवून तिथे घेतली पाहिजे. असं स्पष्ट मत जय पवार यांनी व्यक्त केलं. 

जय पवार यांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चात रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी देखील बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभ वेळी मंत्री अदिती तटकरे यांनी देखील सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचे मुख्यमंत्री बनण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं अशी आमची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर देखील राज्याच्या राजकारणात क्रिया प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आज जय पवार यांनी देखील आपलं मत स्पष्ट बोलून दाखवल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्यात. 

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील 2029 साठी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत अशीही चर्चा आहे. शेवटी सत्तेच्या सारीपाटात आकड्यांचा खेळ महत्त्वाचा असतो. ज्याचं जितकं संख्याबळ जास्त तो मुख्यमंत्री पदावरती आपला दावा करतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या नेत्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगणं गैर नाही, किंवा बोलून दाखव ना हेही चुकीच नाही.

2029 ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीला आमदारांची संख्या वाढवावी लागेल. मगच मुख्यमंत्री पदावरती राष्ट्रवादी काँग्रेसला दावा करता येईल. अर्थात याला आणखीन अडीच तीन वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे दादांची राष्ट्रवादी आमदारांची संख्या वाढवते का ? आणि राज्याच्या प्रमुख असलेल्या मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकते का हे पहावा लागेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow