उजनीत तात्काळ 10 टी एम सी पाणी सोडा ; एक फेब्रुवारीला भिगवणमध्ये होणार रास्ता रोको

Jan 30, 2024 - 13:25
 0  426
उजनीत तात्काळ 10 टी एम सी पाणी सोडा ; एक फेब्रुवारीला भिगवणमध्ये होणार रास्ता रोको

आय मिरर(देवा राखुंडे)

उजनी धरणातून गरज नसताना सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करणे व उजनीच्या वरच्या धरणातून उजनीत प्रत्येकी दोन वेळा 10 टी एम सी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी इंदापूरसह करमाळा, दौंड, कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त एक फेब्रुवारी रोजी भिगवन येथे रास्ता रोको करणार आहेत.यामुळे आगामी काळात उजनी धरणातील पाण्याच्या प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.           

याबाबत इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत उजनी धरणग्रस्तांच्या वतीने महारुद्र पाटील,अंकुश पाडुळे, अरविंद जगताप, बाळासाहेब मोरे, अमोल मुळे, उदय भोईटे यांनी दिलेल्या माहिती व निवेदनरूप या वर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ 60.66 टक्के इतकेच भरलेले होते. परंतु अशी स्थिती असताना देखील 3 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत गरज नसताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले केवळ 10 दिवसांच्या अंतराने दुसरे आवर्तन 11 जानेवारी पासून सोडण्यात आलेले आहे. सोलापूर शहरासाठी पाणी पिणेकरीता नदीतून पाणी सोडल्याने आज उजनी धरण मायनस (वजा) 0.76 च्या खाली गेले आहे. त्यामुळे उजनी धरणासाठी त्याग केलेल्या इंदापूर, करमाळ, दौंड, कर्जत आदी तालुक्यातील मुळ धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे. 

वास्तविक या धरण ग्रस्तांनी धरण निर्मितीसाठी प्रचंड त्याग करताना आपली घरे, जमिनी, गावे व आपल्या श्रद्धा पाण्याखाली गाडलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येता कामा नये.त्यामुळे अनावश्यक रित्या चालु असलेले आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. उजनी धरण ग्रस्तांसाठी दिलासा दायक स्थिती निर्माण होणेसाठी उजनी धरणाच्या वरील 19 धरणातील एकूण 20 टी एम सी पाणी प्रत्येकी 10 या प्रमाणे तात्काळ सोडण्यात यावे. तसेच कालवा सल्लागार समितीमध्ये करमाळा तालुक्यातील दोन व इंदापूत तालुक्यातील दोन उजनी धरणग्रस्त प्रतिनिधींची निवड करण्यात यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.     

या मागण्या पुर्ण न झाल्यास 1 फेब्रुवारी 2014 रोजी भिगवण (ता.इंदापूर) येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात असल्याचेही महारुद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow