शहांच्या माध्यमातून इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचाय त्यामुळे विकासाला मत द्या : मंत्री दत्तात्रय भरणे

Nov 23, 2025 - 11:12
Nov 23, 2025 - 11:13
 0  415
शहांच्या माध्यमातून इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचाय त्यामुळे विकासाला मत द्या : मंत्री दत्तात्रय भरणे

आय मिरर 

तालुक्यात विकासाचा निधी आणायचा त्यासाठी तालुक्याचा आमदार लागतो आणि तालुक्याचा आमदार मी आहे. पुढील चार वर्ष एक महिना मी आमदार राहणार आहे. त्यामुळे विकासाचा निधी कुठेही कमी पडणार नाही. भरत शहा आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे.शहा परिवाराचे शहरात खूप मोठे योगदान आहे,ही लवचिक अशी माणसं आहेत.म्हणून घड्याळाच्या चिन्ह समोरील बटन दाबून तुम्ही विकासाला मत द्या असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये केले. 

इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ इंदापूर मध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा पार पडली या कार्यक्रमाचे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक आप्पासाहेब जगदाळे, पक्षाचे प्रवक्ते शशिकांत तरंगे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री भरणे म्हणाले की,घड्याळाच्या उमेदवारांना मतदान रुपी तुम्ही आशीर्वाद द्या. पूर्वीचे इंदापूर आणि आजचे इंदापूर यात बदल झाला की नाही हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा.2014 पासून गेले 11 वर्षे इंदापूर शहराला कोठून कसा निधी आणता येईल यासाठी मी प्रयत्न केला.नगराध्यक्ष असताना अंकिता शहा यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

कोरोना काळात तुम्हाला कोणी मदत केली याचा नीट विचार केला पाहिजे.कोण माणस आपली असतात याचा विचार करा.आपल्यावर टीका होते पण त्या टिकेला आपल्याला विकासकामातून उत्तर द्यायचे आहे.आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात,त्यासाठी इंदापूरची जनता त्यासाठी खंबीर आहे.

2009 ते 2024 या चार वर्षाच्या काळात मला इंदापूर शहराने भरभरून मतदान दिले.या चारही टर्म मध्ये मी शहरातून आघाडीवर राहिलो. इंदापूर शहराने दिलेले मतदान मी कधी विसरणार नाही.लाडक्या बहिणी मुळे आज मी त्या खुर्चीवर बसलो आहे मंत्री झालो आहे.पूर्वीच आणि आताचे इंदापूर पहा काय होत,पण ही काय जादूची कांडी नाही. त्यासाठी खूप झिजावे लागते.

शहरात आपण अनेक विकासकामे केली अद्यापही करत आहोत. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे काम आपण करत आहोत, काही कारणाने ते काम थांबले असले तरी ते पूर्ण होणार आहे ठिकाणी असणाऱ्या हजरत चांदशहाबली बाबांच्या दर्गाहाच ही काम आपण करत आहोत. मी नेहमी म्हणतो हिंदू असो वा मुस्लिम असो आपण भाई भाई आहोत, माझ्यासारख्या माणसाने कधीही जाती जातीत भांडण लावली नाहीत.या महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांवर कुठे काही झालं एखादा नेता बोलला तर त्याला परखड शब्दात उत्तर देणारा या महाराष्ट्रात एकच नेता आहे त्याच नाव अजित दादा पवार.

तुमचे मत बदलण्याचा आमच्यावर टीका करण्याचा कोण काही प्रयत्न करतील त्यावर विश्वास देऊ नका. आपल्याला इंदापूरचा विकास करायचा आहे.शिरसोडीचा पूल झाल्यानंतर इंदापुरात व्यापाऱ्यांचा पाच पट धंदा वाढणार आहे.इंदापूर शहर बदलणार आहे.आपल्यावर टीका करतात मग या लोकांनी ही कामे का केली नाहीत. हा माझा त्यांना जाहीर सवाल आहे.

मुस्लिम बांधवांची शादी खाण्याबाबत मागणी आहे, शादी खान्याची काळजी करू नका शेवटी दत्तात्रय भरणे या तालुक्याचा आमदार आहे. डीपीटीसी चा निधी मी आणू शकतो, आणखीन चार वर्षे एक महिना मी आमदार असून तुम्हाला निधी देण्याच काम मी करणार आहे.निधी देतो म्हणजे मी काय उपकार करत नाही तुम्ही दिलेली मंत्री पदाची खुर्ची मिरवण्यासाठी नाही. मी काम करताना जवळचा लांबचा जातीचा गटाचा विचार केला नाही. त्यामुळे इंदापूर शहराच्या विकासासाठी विकासासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करा. 

आमच्या लाडक्या बहिणींमुळे आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार झाल्यानंतर मंत्री झाले.त्यांच्यासाठी काही तरी करण्यासाठी इंदापुरात एक वेगळी योजना करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहील.इंदापूर शहरासाठी बंदिस्त गटार योजनेसाठी आपण 61 कोटी रुपयाचा निधी मला त्याची काळजी सुरू आहेत. कुठे रुपये रस्त्याची कामे सुरू आहेत.नगरपरिषदेची नवीन इमारत बांधत आहोत त्यासाठी 10 कोटी रुपये दिले आहेत. एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी 5 कोटी रुपयांची अभ्यासिका मंजूर केली आहे. सौर ऊर्जा प्रकल्प आपण करत आहोत.अशी करोडो रुपयाची कामे शहरात सुरू आहेत.यातून काय उद्देश काय आहे ? इंदापूर करांना चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा मिळाव्यात हाच आहे.56 कोटी रुपयांची क्रीडा संकुल माझ्या इंदापूर शहरासाठी मी क्रीडा मंत्री असताना शेवटच्या दिवशी मंजूर केले.

जे आज एकत्र आलेत त्याचं इंदापूर शहरासाठी एकत्र येणे चांगलं नाही,कोण म्हणत असेल आलेल्यांना उमेदवारी दिली तर तसं नाही तर माझ्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माझं या शहरात सगळ्यात जास्त प्रामाणिकपणे काम कोणी केले असेल तर ते भरत शहा यांनी केल आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिली.आज जे टीका करत आहेत त्यांनी आज पर्यंत ही कामे का केली नाहीत याचे उत्तर द्यावं.

मुस्लिम बांधवांना आव्हान करतो के आम्ही इमारत उभा करणारी माणसं आहोत इमारत तोडणारी माणसं नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. इंदापूर शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा आहे.त्यामुळे दोन डिसेंबरला घड्याळाला मतदान करा.

ज्यांचं मतदान नाही तो माणूस म्हणत आहे 21 शून्य करू...

हे तिघेजण एकत्र का आले,कारण तिघांनी पण एकमेकांना घोलमडले आहे.या निवडणुकीत असेल किंवा त्या निवडणुकीत असेल.हे दोन तीन महिन्यांपूर्वी ठरले आहे.आघाडी झाली ती संस्था बाहेरून आणली आहे.ज्यांचं मतदान नाही तो माणूस म्हणत आहे 21 शून्य करू,भाषणात म्हणत आहेत की बारामती सारखं इंदापूर करू मग बारामती कोणी केली,मग दादाच्या ताब्यात इंदापूर द्यावे लागेल ना ? 

शिरसोडीचा पूल झाल्यावर इंदापूर बदलणार आहे,विकास होणार आहे,बाजारपेठ वाढणार आहे.चांगलं उमेदवार दादांनी मामांनी इथे दिला आहे.कोणी कितीही बोंबलुद्या हे खूप दिवसापासून चालले आहे,त्याकडे लक्ष देऊ नका.इंदापूर शहरात रात्री अपरात्री कोणती ही घटना घडू द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,आता घाबरण्याचे कारण नाही,दांडगी लोक तुमच्या सोबत आहोत.एक फोन करा आम्ही स्वतः येऊ त्यामुळे इंदापूर करांनी चांगला माणूस निवडून द्या.

अनेक जण म्हणत आहेत की 20 वर्षात काय झाले नाही,आज त्यातलीच लोक म्हणत आहेत की आम्ही इंदापूर बारामती सारखं करू.युती झाली ही फक्त वर दाखवण्यासाठी झाली आहे,निवडून आले की हे भाजप मध्ये जाणार आहेत.भरत शहा यांवर एवढा राग का ? मुकुंद शेठ यांचा सहीचा अधिकार काढला. भाषण करताना तुम्ही मामावर टीका करत आहात,पण काय अधिकार आहे तुम्हाला. या चार पाच वर्षात मामाने किती कोटी निधी दिला हे पहा.किती दिवस तरी तुम्हाला दिल आहे आता आम्ही एवढ्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या उमेदवाराला देणार आहे हे त्यांना ठणकावून सांगा असे आवाहन जगदाळे यांनी इंदापूरकरांना केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow