इतरांनी आपल्याकडे बघून म्हटलं पाहिजे आम्हाला इंदापूरसारखं बनायचंय असं काम करू : भरत शहा

Nov 23, 2025 - 10:44
Nov 23, 2025 - 10:45
 0  182
इतरांनी आपल्याकडे बघून म्हटलं पाहिजे आम्हाला इंदापूरसारखं बनायचंय असं काम करू : भरत शहा

आय मिरर 

इंदापूर शहरात आजपर्यंत इतर लोकांचं काम तुम्ही बघितलं आणि गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही केलेलं काम ही बघितलेल आहे. तुमच्या कुठल्याही समस्याला आम्ही सामोरे गेलेलो आहे.तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. विरोधकांच्या आरोपांवर लक्ष देऊ नका,सर्वसामान्य मतदारांना सर्व माहीत आहे.इतरांनी आपल्याकडे बघून म्हटलं पाहिजे की आम्हाला इंदापूर सारखं बनायचं आहे असं काम पुढील काळात आपण करून दाखवू त्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला घड्याळाच्या चित्रासमोरील बटन दाबून भरगोस मत रुपी आशीर्वाद द्या असा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी केले. 

इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी आणि दर्गाह मज्जित चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर नगर परिषदेसाठी उभा करण्यात आलेल्या पॅनल मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली यावेळी शहा बोलत होते. 

या प्रचार सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते डॉ.शशिकांत तरंगे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसची विविध नेते मंडळी उपस्थित होती. 

शहा म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री दत्तात्रय भरणे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल मी आभार मानतो.मी सर्वांसोबत मिसळून राहतो. सर्वांना सोबत घेऊन काम करतो.इंदापूर शहराचा विकास करायचा असेल तर सर्वाधिक निधी देण्याचे काम आजपर्यंतच्या इतिहासात मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी निधी कमी पाडू देणार नाही असा शब्द मला त्यांनी दिलेला आहे.

शास्ती बाबत कोण काय म्हणत असेल पण नगरपरिषद ही काय माझी वैयक्तिक प्रॉपर्टी नाही ती शासनाच्या कायद्याप्रमाणे चालते. शासनाच्या नियमाप्रमाणे शास्ती आणि घरपट्टी आकारली आहे. राज्य सरकारकडे व्याज शासकीय मातीसाठी प्रस्ताव पाठवणारी राज्यातील इंदापूर नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद आहे. त्यामुळे कोण काय टीका करतो याला महत्व देण्यात अर्थ नाही.माझ्या कुटुंबाची अडवणूक करणाऱ्यातला आमचा स्वभाव नाही तेही इंदापूरकरांनी लक्षात घ्यावं.

इंदापूर नगर परिषदेकडून राज्य सरकारला शासकीय संदर्भातील महाराष्ट्रातील पहिला प्रस्ताव गेला आहे.पण काहीही माहिती नसताना खोट बोल पण रेटून असं सुरू आहे.जर तुमच्या मुळे अभय योजना झाली मग ती राज्याला का लागू झाली याचे उत्तर अगोदर टीका करणाऱ्यांनी द्यावे.शास्ती का लागली तर तुम्ही अनधिकृत बांधकाम बांधलं असेल तर त्याला शास्ती लागली असेल पण त्याला जर तुम्ही पाठीशी घालत असेल तर माझ्या दृष्टीने इंदापूर विकसित होऊ शकत नाही. 

इंदापूर जुने शहरात रस्त्याचे पार्किंगचे प्रश्न आहेत.आता हद्द वाढ होईल तेव्हा इंदापूर शहर विकसित करण्यासाठी भरघोस निधी देणारा नेता हवा,म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आम्ही कोणत्याही स्वार्थासाठी प्रवेश केलेला नाही.महिलांना रोजगार पाहिजे यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून शिवणकाम,अन्नप्रक्रिया उद्योग शहरात आणून रोजगार देण्याचे काम आपण सर्वजण मिळून करूया.

माझ्या कुटुंबाने त्यांना काय काय दिले...

ही निवडणूक आम्ही फक्त फक्त विकासाच्या मुद्यावर लढत आहे.चार चार पदे सोडून इथे आलो आहे. पदासाठी आलो असतो तर मी तिकडेच राहिलो असतो.काही नेते म्हणतात की मी त्यांना काय काय दिलं फक्त अंगावरचा जॅकेट द्यायचं राहिलं होतं, मला त्यांना एवढं सांगायचं माझ्या कुटुंबाने त्यांना काय काय दिले हे इंदापूरची जनता जाणत आहे,तुमच्या बरोबर होतो तेव्हाही आम्ही प्रामाणिक होतो.आज आमच्या कुटुंबाने तुम्हाला सगळं काही दिलं आहे, मामाने मला आज काहीही दिलं नाही तरीही मी मामा बरोबर आलो आहे कारण आम्हाला इंदापूर शहराचं चेहरामोहरा बदलायचा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow