निरनिमगाव येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या तर एका मेंढीचा जागीच मृत्यू ! तर अन्य तीन शेळ्या एक मेंढी गंभीर जखमी
आय मिरर
नीरा नदी काठी असलेल्या इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव गावात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करीत दहशत माजवली आहे.एकाच शेतकऱ्याच्या जवळपास पाच शेळ्या एक मेंढी यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार केले आहे.
यामध्ये या शेतकऱ्याचं तब्बल 70 ते 80 हजार रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
निरनिमगाव गावानजीक शिवाजीनगर येथील विलास सिताराम जाधव यांच्या रानात बांधलेल्या शेळ्यावरती रविवारी 5 ऑक्टोबर रोजी भर दुपारी भटक्या कुत्र्याने अचानक टोळक्याने येऊन हल्ला चढवला.
यात पाच शेळ्या आणि एका मेंढीचा चावा घेतल्याने जागीच मृत्यू झाला.तर आणखी तीन शेळया आणि एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे.
दरम्यान गावात मागील काही दिवसांपासून गावासह वाड्या वस्त्यांवर या कुत्र्यांनी जनावरांवर हल्ले करीत आहेत.यामध्ये गाई,म्हशी, शेळ्या,मेंढ्यांसह कोंबड्यांवर देखील ही भटकी कुत्री हल्ला चढवीत आहेत. सध्या गावात या भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत असून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे.
What's Your Reaction?