इंदापूर पोलिसांचा बावड्यातील मटका अड्ड्यावर छापा ; 22 जणांविरोधात गुन्हा दाखल
आय मिरर
इंदापूर पोलिसांनी बावडा गावचे हद्दीत आतारवस्ती येथे बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा घालत कारवाई केली आहे.या कारवाईत इंदापूर पोलिसांनी 15 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 22 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना बावडा गावचे हद्दीत आतारवस्ती येथे बेकायदेशीरपणे मटका चालवला जात आहे याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा घातला असता तब्बल बावीस जण रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून 15250 रुपये आणि पत्याची वेगवेगळे पाने पोलिसांनी हस्तगत केली.
याप्रकरणी इंदापूर पोलिसात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार पोलीस शिपाई विनोद गौतम लोखंडे यांच्या फिर्यादीवरून 1) पंकज तुकाराम चव्हाण रा.भावडी 2) नामदेव जिवबा करगळ, रा. शेटफळ हवेली, 3) रामदास सुखदेव गायकवाड, रा अथुर्णे, 4) गणेश मधुकर भोसले रा वकीलवस्ती 5) आप्पा सुनिल कांबळे रा बावडा
6) कुमार गणपत भुजबळ रा टाकळी ता माढा 7) रणजित देवदास चंदनशिवे रा वडापुरी 8) गणेश सर्जेराव चंदनशिवे रा वडापुरी 9) सुनिल शिवाजी घोगरे रा वकीलवस्ती 10) जावेद नूर महमंद शेख रा अंथुणे 11) आण्णा रामचंद्र गायकवाड रा सुरवड 12) सचिन भगवान चैधरी रा भोडणी 13) शंकर रामचंद्र बोडके रा सुरवड 14) रणजित काका कांबळे रा बावडा
15) अभिशेक बाळु भोसले रा बावडा 16) संतोष वामन लोंढे रा लासुर्णे 17) नितिन उत्तम चंदनशिवे रा वडापुरी 18) सुनिल महादेव धुमाळ रा वकीलवस्ती 19) वैभव दत्तात्रय रूपनवर रा वकीलवस्ती 20) साहिल सोमा गायकवाड रा अंथुर्णे 21) विजय बाबुराव पासगे रा वडापुरी आणि विकास सुभाष बन रा बावडा ता इंदापुर जि पुणे याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?