इंदापूर पोलिसांनी आवळल्या बोगस डाॅक्टरच्या मुसक्या,कांदलगांवातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल ! आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सुरू होता गोरस धंदा
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील देविदास सरडे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी एका बोगस डॉक्टरची पोलखोल केलीय. या डॉक्टरला इंदापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नसल्याचं निदर्शनास आलयं.विजय राजेंद्र वलगे राहणार मुंगशी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या या बोगस डाॅक्टरचं नांव असून पोलिसांनी सहलीचे आयोजन करणा-या निखिल निंबाळकर यांच्यावर ही गुन्हा दाखल केला आहे.संबंधित आरोपीला इंदापूर न्यायालयाने चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील निखिल निंबाळकर याने धार्मिक सहलीचे आयोजन केले होते. यामध्ये इंदापूर तालुक्यातील कांदलगांव मधील शोभा देविदास सरडे या महिलेचा दि.26 जुलै 2023 रोजी मध्यप्रदेशातील ग्वालियर मध्ये शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. मात्र तत्पूर्वी माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथून उत्तरप्रदेशात गेलेल्या श्रीधाम वृंदावन येथील सहलीत सहभागी असणाऱ्या शोभा सरडे यांसह ६ ते ७ महिलांवर या बोगस डाॅक्टरने एका आश्रमात वैद्यकीय उपचार केले होते असं फिर्यादीत म्हटले आहे.
शोभा सरडे यांना व त्यांसोबत असणाऱ्या इतर ६ ते ७ महिलांना उलटी,जुलाब,ताप, पोटदुखीचा त्रास होऊ लागला.यावेळी विजय वलगे आणि आयोजक निखिल निंबाळकर यांनी उत्तरप्रदेशातील मथुरा येथील वृंदावन विश्वसेवा आश्रमात काही गोळ्या औषधे व सलाईन लावत उपचार केले होते.
रुग्णाला तज्ञ डॉक्टरांकडे उपचार कामी दाखल न करता विजय राजेंद्र वलगे हा कोणत्याही अधिकृत पदवी चा डॉक्टर नसताना त्याने केलेल्या उपचारामुळे रुग्नाचा मृत्यू होऊ शकतो हे त्याला माहीत असताना त्याने शोभा सरडे यांवर उपचार केले त्यामुळे रुग्णाला तज्ञ डाॅक्टरांकडून योग्य वेळेत उपचार मिळाले नाहीत.मध्यप्रदेशातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शोभा सरडे यांचा मृत्यू झाला,याला विजय वलगे आणि अनिरुध्द निंबाळकर जबाबदार आहेत असा ठपका फिर्यादी यांनी ठेवला आहे.
विजय वलगे हा माढा तालुक्यातील मुंगशी गावचा रहिवाशी आहे.डाॅक्टर असल्याचे सांगून तो रुग्णांवर उपचार करीत होता.17 जुलै 2023 रोजी कुर्डूवाडी येथून उत्तरप्रदेशातील काही धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी भागवत कथा व सहलीचे बिटरगांव येथील अनिरुध्द ऊर्फ निखील निंबाळकर महाराज यांच्या माद्यमातून आयोजन करण्यात आले होते. या सहलीत इंदापूर तालुक्यातील कांदलगांव तर करमाळा तालुक्यातील बिटरगांव व माढा तालुक्यातील मुंगशी गावातील काही महिला आणि पुरुष 8 हजार रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे सहभागी झाले होते.याच समूहात हा बोगस डाॅक्टर देखील सहभागी होता.
तोतया डॉक्टरवर कारवाई का नाही?
आरोपी विजय वलगे हा मुंगशी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे खासगी दवाखाना चालवतो. मात्र तो तोतया डॉक्टर असल्याबाबत, तथा त्याच्याकडे डॉक्टर असल्याची कोणतीही पदवी नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर त्याची चौकशी तथा त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार देखील देण्यात आली होती. मात्र संबंधितांकडून आरोपीची कोणतीही चौकशी व कारवाई न करता त्याला लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी मोकळीक दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
What's Your Reaction?