२०२९ ला आपलेच सरकार येणार इंदापुरातील मेळाव्यात रोहित पवारांचा मोठा दावा, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Oct 19, 2026 - 07:14
Oct 19, 2026 - 07:21
 0  139
२०२९ ला आपलेच सरकार येणार इंदापुरातील मेळाव्यात रोहित पवारांचा मोठा दावा, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

आय मिरर 

तुम्ही मला आमदार म्हणा अगर नामदार म्हणा पण २०२९ ला आपलेच सरकार येणार असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.ज्याचे आमदार जास्त त्याचे सरकार त्यामुळे आपला आकडा जास्तीत जास्त असणे महत्त्वाचं आहे.विधान परिषद मध्ये आपला आकडा समान आहे तो आपल्याला वाढवायचा आहे.आज देशातील आणि राज्यातील वातावरण पाहिलं तर चार शिव्या या सरकार बद्दल दिल्याशिवाय एखादी व्यक्ती राहणार नाही.सरकारच्या विरोधात वातावरण आहे.त्यामुळे आपले दोन्हीही उमेदवार निवडून येणार. असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पुण्याच्या इंदापूर मध्ये महाविकास आघाडीचे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार हर्षदा जाधव देशमुख आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्याला बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, एडवोकेट राहुल मखरे, अमोल भिसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, सागर मिसाळ, यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्ष्यांचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि पदवीधर शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इंदापूर मध्ये डेटा सेंटर होणार आहे त्याला तुम्ही आम्ही विरोध करतोय पण इथला जो आमदार निवडून आला आहे तो विरोध करणार का? नाही करणार कारण तो सत्तेत आहे.मी विदर्भात गेलो होतो त्या ठिकाणी मी गेलो त्याच ठिकाणी कृषिमंत्री गेले तर त्या लोकांना मला सांगितलं मी त्यांना विचारलं की काय मदत करणार शेतकऱ्यांना शेतकरी म्हणाले ते म्हणाले मला अधिकार नाहीत म्हणाले मुख्यमंत्री सांगतील. जर कृषी मंत्री म्हणत असेल मला अधिकार नाहीत तर मग मंत्रीपदाच काय लोणचं घालायचं का ? 

मंत्री असताना महाराष्ट्रात दबदबा असतो की नसतो आणि कृषी मंत्री असताना केवढा दबदबा पाहिजे, कृषिमंत्री पद कोणामुळे मिळालं अजित दादा....मग तिथे असणाऱ्या कृषी मंत्र्याला कोणी घरी घालवलं, अगोदर कोण होता कोकाटे...मग ते कोणामुळे घरी गेले.... म्हणजे अजित दादांचा वाटा मोठा आहे पण आमचा काहीतरी वाटा आहे ना ? असं म्हणत रोहित पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

बारामतीला पाणी देताना इंदापूर मध्ये होऊ नये अस आम्ही सांगितले होते.पण मग आपल्यातले काही लोक सिंचन भवन पुणे येथे आंदोलन करायला गेले होते. पण मला हे कळालं कृषिमंत्री सुद्धा आंदोलन करायला गेले होते. अहो तुम्ही सत्तेत आहात मंत्र्याला आंदोलन करावं लागत असेल तर सामान्य जनतेच काय वाटुळच झालं ना ? 

कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा आहे एक लाख रुपये मदत करा दुष्काळाची, प्रत्येक मजुराच्या परिवाराला 25 हजाराची मदत करा तुमचं मुख्यमंत्री ऐकत नसतील तर हे योग्य नाही.

इथले आमदार 2029 पर्यंत मंत्री असतील खरंतर तोपर्यंत राहतील की नाही माहित नाही त्या अगोदरच निवडणूक होतील.

पंतप्रधान मोदी परवा चिडले यापूर्वी चिडले होते का, तहसीलदार जर तुमचा ऐकत नसेल तर तुम्ही चिडणार की नाही. यावर्षीचा दुष्काळ आणि 1972 चा दुष्काळ सारखा आहे की नाही. देवाच्या कृपेने आपले धरण भरलं आहे, पण पुढील दोन महिन्यात सरकारकडून आदेश येतील शेतीला पाणी उचलायचं नाही.1972 ला आणीबाणी आली होती आणीबाणी आल्यानंतर सरकार कोणाचा आहे.मग आता आणीबाणी आली आहे 29 ला काय होईल, इतिहास रिपीट होत असतो.

आमच्या शिकलेल्या मुला मुलींना नोकरी देण्याची जबाबदारी कोणाची आहे.आज कोणी आपल्या बाजून बोलत नाहीत.आम्ही बोलत आहोत, आम्ही सरकारला नाकीनऊ आणलं आहे.आम्ही केवळ दहा जण आहोत आणि महाविकास आघाडी धरून 40 असतील,आणखी त्यात दोन वाढले तर काय होईल.

आम्ही नाशिक मध्ये कांद्याचे आंदोलन केलं थेट दिल्लीचा रस्ता अडवला.तीन आंदोलन केले कांद्यासाठी,रस्त्यावर 12000 शेतकरी आले, आमची संख्या पाहता आमची दखल सरकारने घेतली पाहिजे होती का ? असा प्रश्न पडतो कारण त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत. आपण दिल्लीचा रस्ता बंद केला तिथे असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अर्ध्या कॅबिनेटला दिल्लीला जावं लागलं कांद्याचा प्रश्न सोडवायला.

आपली ताकद आहे लोकांनी जर साथ दिली तर अहंकारी सरकारला गुडघ्यावर आणू शकतो.आपण पंढरपूरला बसलो तिथे दोन कोटीचा काढून घेतल्या छत्रपती संभाजी नगरला बसलो एमपीएससी संदर्भात आपण आंदोलन केले.अकरा दिवस बसले कोणी यश आलं की नाही आलं ? 5000 कोटीची जमीन नवी मुंबईत एका बिल्डरला दिली होती आपण आंदोलन केलं सरकारला ती जमीन परत द्यावी लागली.

सात दिवस शिक्षकांच्या आंदोलनाला सरकारमधील एक माणूस आला नाही, ही विनंती केल्यावर आपण पाठिंबा द्यायला तिथे गेलो जर उद्यापर्यंत या ठिकाणी चर्चा कोणाला नाही तर 7000 शिक्षकांना घेऊन मंत्रालयात येणार दुसऱ्या दिवशी मंत्री भेटायला आले.जो टप्पा द्यायचा होता तो शिक्षकांच्या एकजुटीमुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला.

सात ते आठ आंदोलने आपण केली एकही आंदोलन फेल गेलं नाही केवळ तुमच्या पाठिंबामुळे हे आम्ही करत आहे.पुढील दोन-तीन वर्ष लढायला आम्हाला दोन आमदार द्यायला काय हरकत आहे 2029 ला आपला आकडा येईल.2019 पासून हर्षदा जाधव देशमुख यांनी काम केले आहे, उभा कोणालाही राहू वाटतं. पण एखादा उभा राहतो कोणाच्या दुःखात सहभागी होत नाही त्याचं लग्न सुद्धा झालं नाही(कदाचित त्याचा झाल असेल) असा माणूस जर अचानक आमदारकीसाठी उभा राहिला तर तुम्ही काय म्हणाल अगोदर लोकात तरी ये मग आमदारकीला उभा रहा.ज्यांची इच्छाच नाही अशी व्यक्ती उमेदवार म्हणून उभारणार असेल तर मग आम्हाला कोणाला निवडून दिलं पाहिजे. 

इंदापूरची माणसं हुशार अभ्यासू आहेत त्यांना तुम्ही ट्रम्प काय करतोय विचारलं तर सांगतील.कोल्हापूरचा भाजपचा उमेदवार गावडे भाऊ काय बोलले काय सांगू या सगळ्या शिक्षकांवर इतका लोड आहे इतका लोड आहे,अरे तू कोणाचा उमेदवार ? भाजपचा,लोड कोणी टाकला भाजपने,एसआरआय कोणी आणलं भाजपने इतक वाटत असेल तर सोड ना भाजप ला ! उमेदवाराला काय बोलतो हेच माहीत नाही चंद्रकांत दादांनी झापलंय वाटतं.असं बुजगावण आपल्याला चालणार आहे का जो वरच्या आदेशावर चालतो असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य....

२०२९ चा उमेदवार महत्त्वाचा आहे, दादा होते तेव्हा दादांबरोबर राहून आमच्या अपेक्षा होती की दादा आणि साहेब एकत्र यावेत पण दुर्दैवाने दादांच्या बाबतीत जी घटना घडली ती झाली ती झाली.आज दादा असते तर शेतकऱ्यांची हाल झाले नसते.विचाराने मधल्या काही काळात ते भाजप बरोबर असताना आम्ही विरोधात होतो पण मध्यंतरी आम्ही भाजप विरोधात खूप बोललो दादाही बोलायचे आणि खूप भारी वाटायचं आता वातावरण बदलल आहे दादांनाही ते माहित होत पुढे काय होणार आहे पण दुर्दैवानं दादा आपल्यातून गेले.

आपल्या सर्वांची इच्छा होती दादांना न्याय मिळावा पण दादा सारख्या मोठ्या नेत्याला न्याय मिळाला का मग सत्तेत जाऊन तुम्ही काय केलं भजी तळली ? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना नाव न घेता विचारला.ज्या नेत्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली ज्या नेत्यामुळे तुम्हाला मंत्रीपद मिळालं त्या नेत्यांसाठी थोडं तरी बोलावं झगडाव पण तुम्ही स्वतःच्या विकासासाठी तिथे गेला हे सिद्ध होतं पण मी जाहीर करतो दादांना न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

उजनी परिसरात होणाऱ्या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर उतरणार...

उजनी परिसरात डेटा सेंटर येणार आहे, त्या डेटा सेंटरला गार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करोडो लिटर पाणी लागतं.ते पाणी परत वापरता येत नाही,आपण एका एका लिटर साठी लढत आहोत.इंदापूर करमाळा तालुक्याचा जीव पाण्यात आहे. पाणी उजनी धरणात आहे.तिथे डेटा सेंटर आणला जात असेल तर ते चालणार आहे का ? उजनी धरणात पाण्यावर तीन हजार हेक्टर वर सोलर लावणार आहेत.तर पाण्यातील वनस्पती टिकेल का, मासे टिकणार का? मच्छीमार यांना मासा सापडणारच नाही.

न्यूक्लियर पावर देखील तिथे टाकणार आहेत चुकून जर गडबड झाली तरी इंदापूर सोडा बारामती सुद्धा दिसणार नाही. पण आरोग्याचा विषय देखील गंभीर होईल थेट कॅन्सर होतील. अणुबॉम्ब झाला नाही पाहिजे आणि वीज देखील तयार झाली पाहिजे मग त्याला मध्ये लेव्हलला ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा त्यामुळे कॅन्सर वाढणार. पाणी सर्क्युलेट केल्यानंतर पाण्यात कॅन्सरचे प्रमाण वाढू शकत.

पैसे कमवणारे लोक पैसे कमावणार त्यांना कॅन्सर होणार का? इंदापूरकरांना करमाळा वाल्यांना काही दौंडचा भाग आणि खाली माढा यांना कॅन्सर होणार.मासे सुद्धा या गोष्टी खाणार आणि ते मासे आपण देशाला पाठवणार.

विकास कामाला मी विरोध करणार नाही,रस्ते करणार असाल तर आम्ही विरोध करणार. जो भाग ड्राय आहे त्याला पाणी द्या. इथे एमआयडीसी विस्तार करा.अमेरिका आणि युरोप देश या कंपन्या हाकलत आहेत त्या कंपन्या इथे भारतात इंदापुरात येत आहे.नोकरी मिळत नाही इथे नोकऱ्या मिळतात वॉचमन च्या ,आपल्या तालुक्यात पोकलेन कोणाचा आहे तुम्हाला माहित आहे त्याच लोकांना सुरुवातीला काम नंतर काम नाही.

जेडब्ल्यू ग्रुप यांना उजनी धरणाच्या शेजारील जमीन दिली आहे.याचा मालक कोण आहे ते करतो. तो कोणाचा का जावई असो किंवा नातलग असो हा ए आय डेटा सेंटर प्रकल्प इथे होणार नाही म्हणजे नाही.उजनीतील गाळ सरकारने काढावा याचा शेतकऱ्याला फायदा होईल, एमआयडीसी मध्ये आणखीन दोन-तीन कंपन्यांना नोकरी मिळाल्या पाहिजेत केवळ इमारती पाहून त्याचा आम्ही लोणचं घालायचं का ? 

सत्तेतील लोक हा मुद्दा घेणार आहेत का, माझ्या जवळच्या माणसाचा हा प्रकल्प आहे पण अजिबात हा विषय घ्यायचा नाही, आहे का हिंमत लोकांमध्ये म्हणून आपण हा निर्णय घ्यायचा आहे.

लोकप्रतिनिधी गेले उडत....

लोकप्रतिनिधी गेले उडत,ए आय डेटा सेंटर हा प्रकल्प करताना शेतकऱ्यांना इथल्या पत्रकारांना विश्वासात घेतले का ? नाही. नेता मालक आहे का ? ते त्यांच्या जमिनीचे मालक असतील. त्यांना तालुक्यांनी निवडून दिले असेल तरी ते जर हा विषय घेताना विश्वासात घेत नसते तर इथल्या लोकांवर हा अन्याय आहे.

मी काठावर निवडून आलो आहे, पण आता एस आर आय मध्ये कित्येक मतदार रिजेक्ट झाले.आता अनेक जण म्हणतात की ह्या लोकांना आम्ही ओळखत देखील नाही हे पुण्याचे होते. बाहेरून मतदार आणले मतदान केलं निघून गेले आणि शोधायला लागलो तर ते सापडत नाही. हाच मुद्दा ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तापत चालला आहे.

शेतकऱ्यांचा मोठ आंदोलन आपल्याला करायचा आहे.अधिवेशन डिसेंबर महिन्यात आहे.मंत्रीपदामध्ये मंत्र्यांचा आवाज राहिला नाही इंदापूर मध्ये असून सुद्धा तो आवाज राहिला नाही.शेतकऱ्यांनी टेन्शन घेऊ नका,आता आणखी एक आंदोलन करायचा आहे दुष्काळाच.एक तर तुमचं हक्काचं पाणी आणि पीक तुमच्या हातात असताना तुम्हाला चार तास लाईट करायचं सुरू आहे त्यासाठी लढावे लागेल. तुमच्या इथले आमदार तुमच्यासाठी लढतील का नाही सांगता येणार.दुष्काळात ऊसाला सुद्धा मोठा फटका बसला आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे उसाचा देखील पंचनामा व्हावा. माझ्या मतदारसंघात पंचनामे सुरू झाले आहेत. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एक लाख रुपये हेक्टरी मदत मिळाले पाहिजे मागील वर्षी अतिवृष्टी झाली यावर्षी दुष्काळ. देवेंद्र फडणवीस सांगत आहेत सरसकट नुकसान झालं आहे सरसकट मदत करू. तुम्हाला सांगतो कोणावरही विश्वास ठेवा पण या सरकारवर आणि मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवू नका. एमपीएससीच्या आंदोलनात आम्ही लेखी मागितलं आणि कृपा करून आम्ही चिप सेक्रेटरीच लेखी घेतलं.मागील वर्षी अतिवृष्टी झाली तेव्हा त्यांनी अनेक विषय घेतले पण तसं झालं नाही त्यामुळे यंदा तसं होणार नाही.त्यांना गुडघ्यावर आणण्याचे ताकद तुमच्यामध्ये आहे का फक्त आपल्याला एकजूट दाखवावी लागेल.

तर नेत्यांना दिवाळी करू देणार नाही....

एमपीएससीचा आम्ही आंदोलन केलं माझं पोरगं तहसीलदार होणार आहे का ? कांद्याचा आंदोलन आम्ही केलं बाबा आपल्या घरी कांदा आहे का नाही.कर्जमाफीमध्ये 42 लाख शेतकरी अजून राहिले आहेत दिवाळीपूर्वी त्यांना पैसे यायला पाहिजे.केवळ दीड लाख शेतकऱ्यांना आता कर्ज मिळाले आहे बाकीचे शेतकरी कुठे गेले कर्जत कोण देत नाही.मायक्रो फायनान्स ची लोक आता घरी येऊन बसतात घरी महिला असतात त्यांच्याकडे बघत बसतात या सर्व गोष्टीमुळे काही महिलांनी आत्महत्या केल्या आहेत.येणार आंदोलन आणि दीपावलीच्या पूर्वी मराठवाडा विदर्भाच्या आसपासचे आंदोलनाने करणार.दुष्काळमध्ये सरकारकडून मोठी मदत आम्हाला दिली गेली पाहिजे यासाठी हे आंदोलन असेल,जरूर शेतकऱ्याला तुम्ही दिवाळी नीट करून देत नसाल तर कोणत्या नेत्याला सत्ताधारी आमदाराला आम्ही दिवाळी नीट करू देणार नाही.

मध्यावर्ती निवडणुका लागतील रोहित पवार यांचा दावा...

2027 किंवा 2028 पर्यंत निवडणुका होऊ शकतात हे सरकार कडेपर्यंत टिकणार नाही मध्येच निवडणूक होऊ शकतात. 2028 मध्येच लोकसभा होतील.भाजपमध्ये तशी परिस्थिती आहे बरेच नेते एकमेकांचे तोंड पाहत नाहीत.यापुढे विदर्भाबरोबरच पुण्याकडे देखील लक्ष देणार आहोत.

काही लोकांनी इथे मला सांगितलं की अग्रवाल नावाचा आमदार आला आहे.त्याला सांगा तालुका इंदापूरकरांचा आहे आणि इथे येऊन इंदापूरकरांना धमकी दिली तर इंदापूर स्टाईल दाखवावी लागेल.उगाच इथे येऊन कोणाला नाटक करून देऊ नका. काय म्हणतात डोके फोडू आहे त्यांचा सरकार कोणाचे डोके फोडू, आमची आम्ही फोडून देऊ का? मी इथला लोकप्रतिनिधी काय करतोय, काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे होतं. भाजपचा आमदार इथे येऊन बोलतो इंदापूरकरांची डोके फोडतो तरीसुद्धा इथे कोण बोलत नसेल तर मी आश्चर्य आहे आणि मात्र त्याला सोडणार नाही.इथं असणाऱ्या मंत्र्यांनी आमदाराने खंडन करणे तितकच महत्त्वाचा आहे पण ते करणार नाहीत कारण ते सत्तेत आहेत, आमदार भाजपचा आहे आणि त्याचा नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलण्याची ताकद आणि धमक लागते जी आमच्या तुमच्यात आहे आणि त्यांच्यात नाही.

मला देखील ईडीची धमकी दिली मी घाबरलो का नाही तुम्ही सोबत असल्यावर मी कशाला घाबरतो. बऱ्याच लोकांनी मला दादांचा विषय घेऊ नका असं अनेक नेत्यांनी सांगितलं आम्ही घाबरलो नाही दिवाळीच्या अगोदर यात कोणता नेता आहे त्याचं नाव सांगणार आहे.कोणत्याही नेत्याला या ठिकाणी ए आय डेटा सेंटरच्या भूमिपूजनाला पाठवू नका जर कोण आला तर त्यांच्या गाड्या अडवल्या जातील शेतकरी धरणात उड्या मारतील. वीस ते पंचवीस हजार लोक तुम्हाला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी असतील असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

दरम्यान 31 ऑक्टोबर रोजी रोहित पवारांच्या नेतृत्वात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव या ठिकाणच्या ब्रिजवर रास्ता रोको आंदोलन केलं जाणार. पोलीस आले तर मी त्या ठिकाणावरून उठणार नाही. सकाळी 11 वाजता ए आय डेटा सेंटर प्रकल्पाच्या विरोधात सकाळी दहा वाजता हे आंदोलन केलं जाणार. अशी घोषणाही यावेळी रोहित पवार यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow