Breaking News उद्योगपती राणा सूर्यवंशी वर बारामतीत हल्ला, राणा थोडक्यात बचावले

Oct 19, 2026 - 06:22
Oct 19, 2026 - 06:38
 0  1062
Breaking News उद्योगपती राणा सूर्यवंशी वर बारामतीत हल्ला, राणा थोडक्यात बचावले

आय मिरर 

बारामती मध्ये राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरती हल्ला झालाय. बारामती विमानतळाजवळ हा हल्ला झाल्याची माहिती असून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

यात राणा सूर्यवंशी जखमी झाले असून त्यांच्यावर बारामतीच्या खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून राणा यांना आता पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आल आहे.

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हा हल्ला कोणी केला याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. सुरुवातीला राणा यांना बारामती मध्ये खाजगी रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आला आहे.

 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलाय.राणा दिलीप सूर्यवंशी हे राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक आहेत.याच्या अगोदर देखिल राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला होता.

पोलिसांनी सांगितला घटनाक्रम...

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरती सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हल्ला झालाय. यामध्ये राहणार सूर्यवंशी यांच्या खांद्यावर कोयत्याने वार झाला असून पाच ते सहा इंच खोल जखम झाली आहे. 

या घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून स्थानिक गुन्हे शाखेसह फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. या हल्ल्याचा सर्व बाजूने तपास केला जातोय.

स्कुटी वरून आलेल्या दोघांनी चेहऱ्याला मास्क बांधलं होतं आणि आम्ही तुमचे फॅन आहोत आम्हाला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे असं राणा सूर्यवंशी यांना सांगितलं आणि याच वेळी फुलांचा बुके देत असताना कोणत्या राणा सूर्यवंशी यांच्या हातावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

राणा सूर्यवंशी हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गोजुबाबी गावाच्या हद्दीत रेल्वे ब्रिजच्या बाजूला आले होते. त्यांच्यासोबत शासनाने दिलेली सिक्युरिटी नव्हती.याच दरम्यान ही घटना घडली आहे.

सध्या राणा सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार केले जात आहेत. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू असून बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जातोय. असंही उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितला आहे. 

या ठिकाणी गोळीबार झाला की नाही हे अध्यक्ष स्पष्ट झालेलं नाही आम्ही घटनास्थळ तपासला असून त्या ठिकाणी काहीही सापडलेल नाही. प्रत्यक्षदर्शीशी आम्ही चर्चा केली असून त्यांना मोठा आवाज झाला एवढेच सांगितलं त्यावरून गोळीबार झाला हे स्पष्ट म्हणता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे.

टायगर श्रॉफ आणि राणा सूर्यवंशी हल्ल्यावरून रोहित पवार आक्रमक....

अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यात कायदा सुव्यवस्थेची भयानक परिस्थिती आहे.सुदैवाने यात टायगर श्रॉफ यांना इजा झाली नाही. मात्र नेतेही सुरक्षित नाहीत आणि कलाकारही सुरक्षित नाहीत.अशा प्रकारांमुळे सामान्य लोकांची या महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार. असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. 

यासोबतच बारामती मध्ये राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात अतिशय हालाखीची आहे.मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे की तुमचा लोड वाढलेला आहे तुम्हाला आमदार फोडायचे आहेत, तुम्हाला खासदार फोडायचे असतात तुमच्या एखादा उपमुख्यमंत्री नाराज झाला तर त्यांची नाराजगी काढावी लागते.त्यात तुमचा बराच वेळ जात असल्यामुळे सामान्य लोकांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे तुम्ही तुमचं होम डिपार्टमेंट एखाद्या सक्षम व्यक्तीकडे दिले तर बर होईल. असं म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow