इंदापूरच्या श्रावणीनं मिळवलं 14 व्या राष्ट्रीय कुराश चॅम्पियनशिप मध्ये कास्य पदक
आय मिरर
पंजाब मधील लुधियानात पार पडलेल्या 14 व्या राष्ट्रीय राष्ट्रीय सीनियर कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या इंदापूरमधील श्रावणी शिताप या अठरा वर्षीय कन्येनं कास्य पदकाला गवसणी घातलीय.तर ज्युदो मध्ये देखीत श्रावणी शिताप ने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील दोन पदाकांसह राज्यस्तरावरील शेकडो पदकांची कमाई केली आहे.
14 वी राष्ट्रीय सीनियर कुराश चॅम्पियनशिप लुधियाना पंजाब येते 23 ते 25 डिसेंबर दरम्यान पार पडली. यात भारतातून 25 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धात पुण्याच्या इंदापूर मधून सहभागी झालेली श्रावणी प्रशांत शिताप हिने कास्य पदक (ब्रांझ मेडल) मिळवून राज्याचा नावलौकीक तर केलाचं शिवाय इंदापूरकरांनी मान ही अभिमामाने उंचावली.
या यशाबद्दल कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अंकुश नागर व सचिव शिवाजी साळुंखे,आंतरराष्ट्रीय पंच दत्तात्रय व्यवहारे यांनी तिचे अभिनंदन केले.
क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणेंकडून खास शुभेच्छा…
श्रावणी शिताप हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाचं राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तिच्याशी फोनवरुन संवाद साधला असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?