कालपर्यंत तो झोमॅटो चा डिलिव्हरी बॉय आज 'साहेब' झाला, इंदापूरच्या सागरचा थक्क करणारा प्रवास...

Feb 28, 2025 - 14:25
Feb 28, 2025 - 14:26
 0  3258
कालपर्यंत तो झोमॅटो चा डिलिव्हरी बॉय आज 'साहेब' झाला, इंदापूरच्या सागरचा थक्क करणारा प्रवास...

आय मिरर

उच्च शिक्षण घरच्या हालाखीच्या परिस्थितीची जाणीव आणि प्रचंड कष्टाचार जोरावर इंदापूरच्या सागर पिसे याने आकाशाला गवसणी घातली आहे. कालपर्यंत सागर पिसे हा झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आज मात्र तो साहेब झाला आहे.वडील गोविंद पिसे आणि आई अनिता पिसे यांनी सागरला मोलमजुरी करून शिकवलं, याच कष्टाचे सागरने सोन केलं.

आय बी पी एस (IBPS) द्वारे घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक अभियंता महापारेषण (ऊर्जा विभाग) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून इंदापूर येथील सागर गोविंद पिसे यांनी बाजी मारली आहे.

सागरच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, अशाच बेताच्या परिस्थितीत सागर गोविंद पिसे यांचा प्राथमिक शिक्षण इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे गावात झाल.तर विद्यालयीन शिक्षण श्री हनुमान विद्यालय अवसरी आणि शंभू महादेव विद्यालय दगडवाडी येथे झालं. 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी सागरला वाचनगरीतील वर्धमान विद्यालय गाठलं. सागर हा हुशार होता, कष्टाच्या जोरावर त्याने एसबी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली. 

पदव्युत्तर शिक्षणानंतर सागरने पुणे गाठलं.सागरला आपल्या घरच्या बेताच्या परिस्थितीची जाणीव होती. आपण मोठे झालो आहोत स्वतःचा खर्च स्वतः भागवला पाहिजे हे सागरला ज्ञात होतं म्हणूनच त्याने एमपीएससीचा अभ्यास करत असतानाच स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम जॉब करायचा ठरवलं. 

सागरने झोमॅटो या कंपनीत डिलिव्हरी बॉय ची नोकरी मिळवली.दिवसभर अभ्यासिकेत अभ्यास आणि झोमॅटो कंपनीच्या ऑर्डर ग्राहकांना पोहोचवण्याचे काम सागर करत होता. 

ज्या दिवशी सागरच्या या यशाचा निकाल जाहीर झाला त्यादिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठीची सामना रंगला होता. सागरलाही क्रिकेटचा नाद असल्याने हा सामना पाहण्यासाठी त्याने सुट्टी घेतली होती. एकीकडे भारताने या क्रिकेट सामन्यात विजय प्राप्त केल्याचा आनंद साजरा करत असतानाच सागरच देखील नशीब उजळल्याची बातमी त्याच्या मित्राने त्याला येऊन दिली. नकळत सागरच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. सागरच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता.

प्रतिकूल परिस्थितीची जाणीव, कसलेही आर्थिक पाठबळ नसताना घेतलेले कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर रात्रंदिवस केलेला अभ्यास यामुळे सागर इथपर्यंत पोहचला आहे. गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत हे यश प्राप्त केल्यामुळे सागरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow