भिगवण मध्ये पोलिसांचा रूट मार्च,कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

आय मिरर
आज होत असलेल्या बकरी ईद आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूरातील भिगवण मध्ये भिगवण पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.कायदा सुव्यवस्था राखून सण उत्सव साजरे करावेत अस आवाहन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी केल आहे.
या रूट मार्च मध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षक आणि वीस पोलीस अंमलदार आणि बारा होमगार्ड सहभागी झाले होते.
आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आणि सण उत्सवांच्या अनुषंगाने भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी परिसरातून हा रूटमार्च करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सोशल माध्यमांवरती आक्षेपार्य पोस्ट करू नयेत,
जातीय दंगली भडकतील अशा पोस्ट आणि वक्तव्य करू नयेत शांतता राखून सण-उत्सव साजरे करावीत आणि पोलिसांना सहकार्य करावे असा आवाहन भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केलं आहे.
What's Your Reaction?






