एसटी थांबवली नाही म्हणून वाहन चालक आणि वाहकाला बेदम मारलं, दौंडच्या खडकीतील घटना

Jun 4, 2025 - 12:16
Jun 4, 2025 - 13:03
 0  3783
एसटी थांबवली नाही म्हणून वाहन चालक आणि वाहकाला बेदम मारलं, दौंडच्या खडकीतील घटना

आय मिरर 

पुण्याच्या दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दौंड तालुक्यातील खडकी जवळ एसटी बस चालकाला आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. यासोबत बसवर दगडफेक देखील केल्याचं पुढे आलं आहे.

बस थांबवली नाही म्हणून चालक आणि बस कंडक्टरला मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात दौंड पोलिसात एसटी चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण काळे याच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूर ते मुंबई या गाडीतील चालक आणि वाहकाला मारहाण करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या बस मध्ये जवळपास 43 प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी या बसला थांबा नव्हता तरीदेखील आरोपींनी रस्त्याच्या मध्यभागी उभा राहूनही बस अडवण्याचा प्रयत्न केला. या बसवर दगड मारले. त्यानंतर वाहन चालक आणि वाहक यांना हाताने मारहाण शिवीगाळ करण्यात आली.

दौंड पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकी गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. वाहन चालक ज्ञानोबा वाघमारे हे आपल्या ताब्यातील अहमदपूर मुंबई ही बस घेऊन निघाले होते. दरम्यान खडकी बस स्टॉप वर ही बस आरोपींनी रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून वाढवण्याचा प्रयत्न केला. बस थांबवली नाही म्हणून आरोपींनी बसला दगड मारला.तुम्ही खडकी गावातील बस थांब्यावरती बस का थांबवत नाही. अशी विचारणा करत एसटी चालक वाघमारे आणि एसटी वाहक गोविंद चंद्रपालसिंह गहेरवाल यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणत एस.टी बसचे नुकसान केले आहे. 

बस चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात प्रवीण काळे याच्यासह सात जणांविरोधात गु.रजि नं 398/2025 भा.न्या.संहिता कलम 189(2),191(2) ,190,132, 115(2),351(2),352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार मलगुडे करीत आहेत.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow