बारामतीत आढळले होते धड नसलेले लहान बाळाचे मुंडके, बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात दाखल झाला खूनाचा गुन्हा
आय मिरर
बारामती शहरातील सूर्यनगरीमध्ये बुधवारी सायंकाळी नवजात अर्भकाच्या डोक्याचा भाग सापडल्याने खळबळ उडाली होती. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकास सूर्यनगरीमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये अज्ञात व्यक्तीने टाकून दिले होते. त्याच्या शरीराचा डोक्याच्या खालचा भाग नाहीसा झाला होता. या संदर्भात आता सहा.फौजदार अनिल विठ्ठल ओमासे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरोधात गुरुवारी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दि.०३ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बारामती मधील सूर्यनगरी येथील गणराज्य कॉम्प्लेक्स समोरून पूर्वेकडे जाणारे मुरमाच्या कच्चा रस्त्यावर लहान बाळाचे धड नसलेले मुंडके मिळून आले होते.ही घटना निदर्शनास येताच उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांसह पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.
What's Your Reaction?