नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षणावर गुन्हा दाखल

Jun 24, 2024 - 06:51
 0  342
नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षणावर गुन्हा दाखल

आय मिरर

नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात काल नांदेडच्या एटीएसच्या पथकाने लातूरच्या जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांना एटीएस कडून संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं होत, संजय जाधव आणि जलील पठाण असं या शिक्षकांची नावे आहेत.

एटीएस कडून दोघांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं होत,मात्र रात्री उशिरा पुन्हा लातूर पोलीस आणि एटीएस कडून लातूरच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.दोन शिक्षकापैकी जलील पठाण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे,तर संजय जाधव याचा पोलीस शोध घेत आहेत.

मात्र सध्या पर्यंत पोलिसांकडून या संदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आली नाही.या सर्व प्रकरणात आणखीन काही धागे दोरे लागतात का ? आणखीन याच्यामध्ये कोणी सहभागी आहेत का यांची चाचपणी लातूर पोलीस सध्या करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow