भिगवणला १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मराठा महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन

आय मिरर (निलेश मोरे)
भिगवण (ता. इंदापुर) येथे अखिल भारतीय मराठा महासंघ संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त सालाबादप्रमाणे राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे १४ ते १८ फेब्रुवारी च्या दरम्यान एस. के. कलेक्शन व शिवरत्न मंगल कार्यालयाच्या समोर दररोज सायंकाळी ७ वाजता आयोजन केले असल्याची माहिती राजकुमार मस्कर, अॅड. पांडुरंग जगताप, छगनराव वाळके, डॉ. संकेत मोरे, डॉ. पद्मा खरड, सुचिता साळुंखे व प्रशांत गायकवाड यांनी दिली.
उद्घाटन शुक्रवार (ता.१४) रोजी अॅड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते होणार असून प्रथम पुष्प "मानवाचे भवितव्य "आजच्या या दूषित वातावरणात आपण जगायचे कसे, या विषयावर पर्यावरणवादी विशेष अभ्यासु व्यक्तिमत्व प्रा.बी.एन. शिंदे अहिल्यानगर हे व्याख्यान देणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिगवण ग्रामपंचायतचे उपसरपंच सत्यवान भोसले हे भूषवणार आहेत.
द्वितीय पुष्प शनिवार (ता.१५) रोजी " जगणं कसं असावं " या विषयावर जितेंद्र दादा असोले गोंदिया हे व्याख्यान देणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे हे भूषवणार आहेत तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील माजी नगरसेवक नारायण जानू पवार हे उपस्थित राहणार आहेत. तृतीय पुष्प रविवार (ता. १६) रोजी "माझे डोळे गेले दृष्टी नाही" या विषयावर अनघा मोडक मुंबई या व्याख्यान देणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहिल्यानगर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अॅड. स्वाती जाधव या भूषवणार आहेत. चतुर्थ पुष्प सोमवार (ता.१७) रोजी "महापुरुषांचे विचार व आजची तरुणाई" या विषयावर बीड येथील राहुल गिरी हे व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिगवन पोलीस स्टेशन येथील
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे भूषवणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा व्यापार व उद्योग विभागप्रमुख मोहन काका काळभोर उपस्थित राहणार आहेत पाचवे पुष्प व समारोप मंगळवार (ता.१८) रोजी " गोष्ट भारताची" या विषयावर पुणे येथील संजय आवटे हे व्याख्यान देणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सचिव विलासराव घुमरे सर हे भूषवणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील उद्योजक बापूसाहेब खराडे हे उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे विशेष सन्मान म्हणून परिसरातील कर्तुत्वात महिलेला राजमाता जिजाऊभुषण पुरस्कार दिला जाणार आहे. व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष असून महाराष्ट्रातील एक नावाजलेले व्याख्यानमाला म्हणून या व्याख्यानमालेकडे पाहिले जाते.
What's Your Reaction?






