इंदापुरात बॉम्ब सापडले पण एक दोन नव्हे तर तब्बल 9 ! वालचंदनगर पोलिसांनी वेळीच केला गेम

Sep 9, 2024 - 17:08
Sep 9, 2024 - 17:33
 0  2694
इंदापुरात बॉम्ब सापडले पण एक दोन नव्हे तर तब्बल 9 ! वालचंदनगर पोलिसांनी वेळीच केला गेम

आय मिरर

टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोराकडून ताब्यात घेतलेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके,वय २३ वर्षे,राहणार कळंब तालुका इंदापुर जिल्हा पुणे असं आरोपीचं नांव आहे.याबाबत आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वालचंदनगर पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टन आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुस्क्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती व ईद-ए-मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके रा. कळंब याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते.तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक ०१ येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी - 3 मधील खोली क्रमांक 03 मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वालचंदनगर पोलिस ठाण्यातील पो.हवा स्वामी, पो.हवा काटकर, पो.हवा बनसोडे,पो.काँ. चितकोटे, पो.काँ.चोपणे, पो.काँ.सोनावणे, म.पो.काँ.कर्दिक यांच्या पथकाने बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पो. निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपीला ताब्यात घेतले.

यात पोलिसांनी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन,दहा जिवंत काडतुसे (राऊंड),चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर,एक लोखंडी तलवार,दोन लोखंडी चाकु, एक मुठ नसलेले तलवारीचे पाते आणि 9 सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow