कर्कश आवाजामुळे होत असलेले ध्वनी प्रदुषण थांबवा ! पाटस डॉक्टर असोसिएशनची मागणी

Feb 12, 2025 - 15:01
 0  288
कर्कश आवाजामुळे होत असलेले ध्वनी प्रदुषण थांबवा ! पाटस डॉक्टर असोसिएशनची मागणी

आय मिरर

डीजे, स्पिकर यासह दुचाकींचे सायलेन्सर बदलून केल्या जाणाऱ्या कर्कश आवाजामुळे होत असलेले ध्वनी प्रदुषण थांबवण्याची मागणी दौंड तालुक्यातील पाटस डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे. हातात कोरडे घेऊन पाटस डॉक्टर असोसिएशन ने या संदर्भात जनजागृती रॅली काढत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पाटस हॉस्पिटल व शाळा जवळ डीजे / स्पिकर च्या कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होत आहे. तसेब, मोटर सायकलच्या पुंगळ्या काढून/बुलट च्या सायलन्सरमधुन निघणारे कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होत असल्याने याचा त्रास सर्वांना होत आहे.आवाजाची तीव्रता ४५/५५ डीबी ला परवानगी असताना डीजे चा आवाज प्रमाणा पेक्षा जास्त ठेवतात त्यामुळे त्या डीजे चालकांवर ध्वनी प्रदुषण कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटस डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

काय पूर्ण होऊ शकतो ? 

1) ध्वनी प्रदुषणामुळे रक्तदाब वाढतो, धडधड वाढते, सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा येऊ शकतो तसेच कानाचे पडदे फाटतात.

2) वयस्कर रुग्णांना तसेच नवजात बालकांना मोठ्या आवाजामुळे जीवाला धोका निर्माण होत आहे.

3) मोठ्या कर्कश आवाजामुळे शाळेतील शिकणाऱ्या मुलांचे लक्ष विचलित होते,चिडचिड होते, कार्यक्षमता बिघडते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow