Indapur | ईद-ए-मिलाद निमित्त इंदापूरात जुलूस उत्साहात
आय मिरर
इस्लाम धर्म संस्थापक हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय. गणपती उत्सवा नंतर ईद-ए-मिलादच्या जुलूसचं आज आयोजन करण्यात आलं होतं.
पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर मुस्लिम बांधवांनी दोन दिवसांनंतर हा जुलूस काढला.शहरातील दर्गाह मस्जिद चौकापासून या जुलूसला सुरुवात झाली. यामध्ये मुस्लीम बांधवांबरोबरच लहान मुलांचा देखील मोठा सहभाग होता. चौका चौकात या जुलूसचे स्वागत करत सरबत ,गोड खाद्यांसह ,मिठाईचे वाटप करण्यात आले.
तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने पाणी बाटलीचे वाटप
दरम्यान तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने या जुलूस मध्ये सहभागी झालेल्यांना पाणी बाटली चे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांनी पाणी वाटप करत हिंदू मुस्लिम ऐक्याचा नारा दिला.या कार्यक्रमास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांसह इतर मान्यवरांनी भेट देऊन तेजपृथ्वी ग्रुपचे कौतुक केले.यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे प्रभारी सद्दाम बागवान, विशाल म्हेत्रे, संदिप रेडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?