राजू शेट्टी तीन गुन्ह्यातून निर्दोष ! इंदापुर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापुरात सन 2012 साली ऊस आंदोलनातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 21 जणांची इंदापुरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. शेट्टीसह शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत,सतीश काकडे यांचा यात समावेश आहे.
इंदापूर येथे 2012 साली झालेल्या ऊस आंदोलनात एकुण 8 गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यांपैकी 29 डिसेंबर 2025 रोजी तीन गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.तर उर्वरित 5 गुन्हा संदर्भात खटला सुरू होता.त्यातील 3 गुन्ह्यात आज 21 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून अद्याप दोन खटल्यांचा निकाल प्रलंबित आहे.
आजच्या निकालात राजू शेट्टी यांच्यासह सतिश काकडे ,सदाभाऊ खोत , निलेश देवकर यांच्यासह 21 आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2012 साली ऊस आंदोलनात 2700 रूपये ऊसाला प्रति टन पहिली उचल द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.राज्यातील साखर कारखानदारांपैकी कोणीच उसाची पहिली उचल जाहीर केली नव्हती. त्यावेळी राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्विकारून तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले होते.
सोलापूर- पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. याच वेळी कुंडलिक कोकाटे हा तरूण शेतकरी या आंदोलनात शहीद झाला.यानंतर शेकडो शेतक-यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
जवळपास आठवडाभर झालेल्या आंदोलनातील संघर्षानंतर 2500 रूपये राजारामबापू कारखान्याने पहिली उचल जाहीर केली व ऊस दराची कोंडी फुटली.मात्र राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना या आंदोलनाने प्रतिटन 300 रूपये जादा दर मिळाला.
इंदापूर न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एच.फारूकी यांचे कोर्टात या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज ॲड. एन.जी.शहा ,ॲड. महेश ढुके , ॲड.श्रीकांत करे यांनी विनामुल्य पाहिले.
What's Your Reaction?