अन् क्षणात आपण पोरके झालोत.. सुनेत्रा पवार अपघातावर 18 दिवसांनी पहिल्यांदाच बोलल्या
आय मिरर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी 18 दिवसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दादा कामासाठी सकाळी सकाळी लवकर उठून निघाले क्षणात आपण पोरके झालो अशी भावनिक प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती मधील सहयोग भवन मध्ये इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक विजय झालेला नवनिर्वाचित सदस्यांसोबत संवाद साधला आणि या संवादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियात वायरल होतोय.
या संवादावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे देखील उपस्थित होते.
या संवादावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, इंदापूर तालुक्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.मी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देते.दादांच्या मनातील जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी तुम्हाला संधी मिळाली आहे.तुम्ही दादांच्या मनातील स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते.अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मला असं कधी वाटलं नव्हतं की मी इथे तुमच्याशी बोलेल असं म्हणत सुनेत्रा पवार भावूक झाल्या, उपस्थित सर्वांच्या डोळ्यात यावेळी पाणी आलं. पुढे सुनेत्रा पवार म्हणाल्या की,दादा म्हणायचे की ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे पुढे तीन वर्षे निवडणुका नाहीत.तेवढ्याच उत्साहाने प्रत्येक निवडणुकीमध्ये दादा जिवाचं रान करायचे.या ही निवडणुकीत त्यांनी जिवाचं रान केलं.त्या दिवशी सकाळी सकाळी ते यायला निघाले आणि एका क्षणात आपण सर्वजण पोरके झालोत.पण काम आणि काम हे एकच दादांचं ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीचं आपण सर्वांनी केल्या पाहिजेत अशी भावनिक साद ही सुनेत्रा पवार यांनी घातले.
What's Your Reaction?