भिगवणच्या उपसरपंच पदी सत्यवान भोसले

Oct 19, 2024 - 11:38
 0  145
भिगवणच्या उपसरपंच पदी सत्यवान भोसले

आय मिरर ( निलेश मोरे )

भिगवणच्या उपसरपंच पदी सत्यवान भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मावळत्या उपसरपंच मुमताज जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामूळे दि. १७ रोजी भिगवण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेमध्ये सत्यवान भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच दिपिका क्षीरसागर व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी जाहीर केले.

या निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सत्यवान भोसले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य,महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow