दगडवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश ! हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार

आय मिरर(देवा राखुंडे)
दगडवाडी येथील भारत सूळ, अमोल मोटे, सतीश काळे, सुरेश सूळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर येथे सोमवारी (दि.5) प्रवेश केला. या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला.
याप्रसंगी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, दगडवाडी गावातील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते रामदास रासकर, राजू सूळ, मनोज निंबाळकर, सोसायटी चेअरमन सचिन रासकर, रणजीत रासकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपचा महाराष्ट्रासह देशामध्ये जनाधार वेगाने वाढत असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
What's Your Reaction?






