पुरंदरची गाडी केवळ निवडणुकीपुरती पळणार नाही नवा अध्याय उभारू : कमळ हाती घेताच संजय जगतापांचा निर्धार  

Jul 16, 2025 - 17:41
Jul 16, 2025 - 17:41
 0  472
पुरंदरची गाडी केवळ निवडणुकीपुरती पळणार नाही नवा अध्याय उभारू : कमळ हाती घेताच संजय जगतापांचा निर्धार  

आय मिरर 

आम्ही केवळ पुरंदर हवेली पुरतं मर्यादित नाही तर पुणे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी कुठल्याही पैलवानाच्या पाठीला माती लागलेली दिसणार नाही प्रत्येक पैलवान जिंकलेला दिसेल पुरंदर हवेलीच्या जनतेला केवळ आणि केवळ विकास हवा आहे.सर्व मंडळी या जिल्ह्यात आम्ही येणाऱ्या काळात भाजपाचा प्रचार आणि प्रसार तळागाळापर्यंत पोहचवू जी जबाबदारी द्याल ती शेवटपर्यंत तळमळीने पार पाडण्याचं काम मी करेन.विकासाच्या कामात राजकारण करू देणार नाही. पुरंदर हवेलीत नवा अध्याय उभा करू असा निर्धार पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.

पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

जगताप म्हणाले की,भाजपमध्ये विकास आहे तिथे विकासाला दिशा आहे तिथे राजकारण नाही.म्हणून मी भाजपात गेलो. राष्ट्रीय महामार्गासारखे प्रकल्प तिथे होतात, कुठलेही प्रकल्प शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊन होत नाहीत.पंधराशे कोटी रुपयाचे कॉमनझेशन माझ्या शेतकऱ्याला रिंग रोडच्या माध्यमातून मिळालं.

संत सोपान काकांच्या पावनभूमीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय,माझ्या स्वभावात थोडासा दोष आहे कधीच मी वेळेवर येत नाही आज सकाळपासून अनेकांना वाट पाहावी लागली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात मी काही बसेसची मागणी केली होती, राजुरी हे शेवटचं गाव आहे त्या ठिकाणी साडेतीन किलोमीटर पुढे रिसेपिसे गावाला एसटी जाण्यासाठी मी एक महिनाभर पाठपुरावा घेत होतो.संवाद मेळावा दिवशी मला पक्ष कडून फोन आला रिसेपिसे गावापर्यंत एसटी जाईल,त्यात मला पक्षाची ताकद दिसली आणि एसटीचा निर्णय झाला.

1980 आम्ही माझे वडील चंदूकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे. सहकाराचे जाळे विविध संस्थांची जाळी आम्ही निर्माण केलीस्किल डेव्हलपमेंट चा विचार घेऊन आम्ही पुढे चालत राहिलो.2015 साली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करायचो.पण पुरंदर तालुक्याचे व्यथा वेगळी सांगायची गरज नाही,अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 

विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार...

पुरंदर तालुक्यातील विमानतळाचा प्रश्न मोठा आहे. विमानतळांच्या बाबतीत सात गावांच्या प्रतिनिधींनी कमिटी तयार केली आहे.देवेंद्र फडणवीस या राज्याची अतिशय तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत, या सात गावांच्या समितीची मीटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावतील.विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य जागी होणार याबाबतचा निर्णय होणार हा माझा शब्द आहे.अस ही जगताप म्हणाले.

दुसरा प्रश्न गुंजवणीचा आहे. अनेक वर्ष मी त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे. मधूनच पाईपलाईनचे काम होत आहे असू दे होऊ दे.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प होत असताना पुरंदर तालुक्यातील नागरिक गेले अनेक वर्ष याची पाहत आहोत.यामुळे पुरंदरची आणि कऱ्हा नदीची पाण्याची समस्या कायमची सुटेल. अनेक प्रश्न आहेत तुम्ही म्हणाल की तुला घरी पाठवले आणि एवढे प्रश्न का सांगतोय पण मी चंदूकाकांचा मुलगा आहे असं सांगायलाही जगताप विसरले नाहीत.

मी या विचारांकडे का आलो, 2019 ला एमजीबी च्या माध्यमातून दोन टीएमसी पाणी खडकवासल्यातून पुण्याच्या दक्षिण भागात पिण्याच्या पाण्याची योजना व्हावी ही संकल्पना मी मांडली होती. पण ती योजना एमजीबी आणि पुणे जिल्ह्यापर्यंतच थांबली पुण्याच्या पुढे गेली नाही.अमृत दोन मध्ये ही गावी घेरीत म्हणून सातत्याने प्रयत्न केला पण आजपर्यंत ठोस असं नियोजन होऊ शकलं नाही. वडकी अशा ठिकाणी 37 कोटी रुपयांची पाण्याची योजना आणण्याचा निश्चय केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून ती योजना पूर्ण होत आहे. 

मागील पाच वर्षाच्या काळात 2019 पासून 2024 पर्यंत एक लाख 78 हजार रुपये केवळ अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा झाले.सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात पैसा देण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केले.

सामान्य कार्यकर्ता म्हणून मी भाजप मध्ये प्रवेश करतो आहे, काही मंडळींनी मला फोन केला, एकदम का निर्णय घेतला आहे. मी त्यांना सांगितलं काही अपभ्रमश त्या ठिकाणी आहे, पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सामाजिक समरसते वरती भाष्य केलं होतं मला ते मुद्दामहून या ठिकाणी सांगायचे आहे भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार आम्हाला भावला तो म्हणजे सामाजिक समरसतेच आहे.

आता केवळ निवडणुकीपूर्ती पळणार नाही...

माझ्याबरोबरच्या सर्व मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे. जे थांबलेले आहेत ते माझ्याबरोबर चालण्यास सुरुवात करणार आहेत मी एक दोन पावले पुढे टाकली की ती सोबत येतील.पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या तुतीच्या उत्पादनातून पैठणच्या प्रतीची पुरंदरच्या मातीतील कराई हा साडीच्या ब्रँडची संकल्पना आम्ही मांडली आहे.दोन वर्षे झाले की मंजूर आहे पण अजून ते काम झालं नाही. मधल्या काळात फुकटच्या साडीने आमच्या संपूर्ण तालुक्याला गुंडाळून टाकले आहे.

एसटी चालू होत नाही पोलीस ठाण्याच्या अडचणी आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत. सासवड नगरपालिकेकडे केवळ दहा घंटा गाड्या आहेत, सहाची गाडी 10 ला येते हे राजकारण पुरंदर तालुक्यात चालतं.उद्याच्या काळात आपण ताकद दिली तर सासवड पासून दहा किलोमीटरवर सिंगापूर म्हणून गाव आहे, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान सीताफळ स्टेटस, गुंजवणीचा नदीजोड प्रकल्प असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पोचवण्याचं काम पुरंदर हवेलीची जनता करील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow