पुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाचा अत्याचार, अश्लील व्हिडिओ दाखवत म्हणाला...
आय मिरर
मावशीच्या नवऱ्याने अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सख्ख्या नात्यांवरील विश्वास उडवणारा हा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात पीडित मुलीचा मावसा अर्थात मावशीच्या नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून काही कौटुंबिक कारणांमुळे ती मावशी-काकाच्या घरीच वास्तव्यास होती. घरात कोणी नसताना काकाने पीडितेचा विश्वासघात करत अश्लील व्हिडिओ दाखवले. तिच्यावर विकृत पद्धतीने लैंगिक अत्याचार सुरू केला.
पीडित मुलगी ही दिव्यांग असून तिच्या आईच्या गैरहजेरीत ती आपल्या सख्ख्या मावशी-काकाच्या घरी वास्तव्यास होती. या काळात आरोपीने घरात कोणी नसताना पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. "हे लग्नानंतर करावंच लागतं" आणि "रात्री मी तुझ्या मावशी सोबत हेच करतो" असं सांगत मानसिक फसवणूक केली आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरू केला.
हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. आरोपीने तिला सतत धमकावत आणि अश्लील व्हिडीओ दाखवून संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडित मुलगी ही दिव्यांग आणि अल्पवयीन असल्याने ती या प्रकारात अडकली गेली.
मावशीने रंगेहाथ पकडलं
काल रात्री आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मावशीने अचानक घरात प्रवेश करून प्रत्यक्ष घटना पाहिली. यानंतर तिने पीडित मुलीच्या आईला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
What's Your Reaction?