राजवर्धन पाटील अंकिता पाटील ठाकरेंनी बारामतीत घेतली शर्मिला पवारांची भेट

Oct 21, 2024 - 14:58
 0  287
राजवर्धन पाटील अंकिता पाटील ठाकरेंनी बारामतीत घेतली शर्मिला पवारांची भेट

आय मिरर

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आज बारामतीत शर्मिला पवार यांची भेट घेतली आहे. शर्मिला पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सखे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी असून युगेंद्र पवार यांच्या त्या आई आहेत.

शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात बारामती लोकसभेला प्रचार केला होता आणि त्यांचा संपर्क इंदापुरात देखील मोठ्या प्रमाणावर आहे.आगामी इंदापूर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळतं आहे.यावेळी सागर मिसाळ ही उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow