शिवसेना शिंदेगटाच्या उपजिल्हा प्रमुख पदी इंदापूरच्या अण्णासाहेब काळे यांची निवड

Sep 22, 2024 - 06:58
Sep 22, 2024 - 06:59
 0  123
शिवसेना शिंदेगटाच्या  उपजिल्हा प्रमुख पदी इंदापूरच्या अण्णासाहेब काळे यांची निवड

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर येथील अण्णासाहेब काळे यांची शिंदेगट शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख या पदाची नियुक्ती करण्यात आली.

 या प्रसंगी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब काळे यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

पक्षाचे विचार आणि धेय्यधोरणे आपण तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे काळे यांनी निवडीनंतर सांगितले आहे.

याप्रसंगी शिवसेना महिला पुणे जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर, इंदापूर तालुकाप्रमुख रामचंद्र जामदार, शिवसेना इंदापूर शहरप्रमुख शुभम जामदार, विजय पवार, राजाभाऊ जानकर, धनंजय पवार, रूपचंद जाधव, अशोक देवकर, विशाल धुमाळ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow