करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी द्या ! धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी 

Feb 6, 2025 - 12:53
 0  352
करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी द्या ! धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी 

आय मिरर

करुणा मुंडे यांनी राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांनी दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत.

बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे आरोप करत मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी केला होता. या प्रकरणावरून धनंजय मुंडे खिंडीत सापडलेले असतानाचा आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत.

करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. त्यातील आरोप मान्य करण्यात आले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिला आहे. करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय, करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow