लोकसभेच्या तोंडावर सुप्रिया सुळेंना मोठा धक्का ! बारामती जिंकण्यासाठी महायुतीने प्रचार प्रमुखचं फोडला
आय मिरर(देवा राखुंडे)
देशातील सर्वांचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवणुकीत आता चुरस वाढली आहे. सुरुवातीला अजित पवार यांच्या विरोधात वातावरण पाहिलं मिळत होतं. एकीकडे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला होता.
तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनीही विरोधात काम करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, आता वातावरण फिरलं असून एकएक लोक अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात येत आहे. इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम करणारे प्रविण माने यांनी त्यांची साथ सोडली आहेत. माने आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
सुप्रिया सुळे यांना धक्का
इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी महायुतीच्या बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या समवेत रिंगणात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी घड्याळापेक्षा तुतारी भारी व तुतारीचा आवाज दिल्लीत घुमवू असे आवाहन करून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केलेले प्रविण माने यांनी आज सुप्रिया सुळे यांची साथ सोडून विकासाला साथ म्हणून अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यांनी आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू केला आहे.
विजय शिवतारेंकडून अजित पवारांसाठी मोर्चेबांधणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध करत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लोकसभा लढवण्याची घोषणा करणारे शिवसेना नेते विजय शिवतारे हे आता त्यांच्याच प्रचारासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिवतारे यांनी बारामतीमध्ये विरोधाची तलवार म्यान केली होती. आता 11 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली आहे.
What's Your Reaction?