Baramati | वडगाव पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई

Sep 26, 2024 - 08:38
 0  261
Baramati | वडगाव पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई

आय मिरर

बारामती तालुक्यातील निंबुत येथे असणाऱ्या हातभट्टीवर वडगांव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केलीय. यामध्ये पोलिसांनी हाजारो लिटर रसायन नष्ट केलय.निंबुत येथील नीरा मोरगाव रोड नजीक नीरा डाव्या कालव्या शेजारील असणाऱ्या काटेरी झुडपामध्ये ही हातभट्टी सुरू होती.यात पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्यमान नष्ट करण्यात आलाय.  

वडगाव निंबाळकर पोलिसांनी धाड टाकून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, टाक्या,प्लास्टिकचे कॅन्ड, एक एचपी मोटर, प्लास्टिकचा काळा कागद, लाईट साठी लागणारी केबल असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा माल नष्ट केला आहे.

बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या हातभट्टीमुळे येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.रात्री-अपरात्री फिरणाऱ्या गाड्या यामुळे येथील शेतकरी देखील भयभीत झाले होते.गेल्या अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या हातभट्टीवर कारवाई करावी अशी येथील ग्रामस्थांनी तक्रार देखील केली होती.त्याच अनुषंगाने वडगाव पोलिसांनी दमदार कामगिरी करत जेसीबीच्या साह्याने ही हातभट्टी उध्वस्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow