बिग ब्रेकिंग | घरात घुसून मायलेकरावर सपासप वार ; हत्येने पंढरपूर शहर हादरलं
आय मिरर
पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरु केला आहे.
हत्येबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर नाही...
कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर आई सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली ? कुठल्या कारणावरुन झाली? याबाबत कुठलीच ठोस माहिती अद्याप पुढे आली नाही.
जगताप यांची हत्या नक्की कोणी केली?
दरम्यान लखनचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली? कुठल्या कारणावरून झाली? याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आली नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरू केला आहे.
पंढरपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब, आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या अमानुष घटनेमुळे कुंभार गल्लीत आणि पंढरपूर शहरात भीती व संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेचा शोध लावून दोषींवर कडक कारवाई करावी , अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
What's Your Reaction?