इंदापुरातून शरद पवारांचे कार्यकर्ते पवारांच्या भेटीला रवाना, पुण्यात घेणार पवार-सुळेंची भेट

Oct 5, 2024 - 16:49
Oct 5, 2024 - 16:54
 0  1566
इंदापुरातून शरद पवारांचे कार्यकर्ते पवारांच्या भेटीला रवाना, पुण्यात घेणार पवार-सुळेंची भेट

आय मिरर

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची घोषणा केलीय. येत्या सोमवारी सात तारखेला हर्षवर्धन पाटलांचा पक्ष प्रवेश इंदापुरात पार पडणार आहे. हर्षवर्धन पाटील हेच पवार गटाचे इंदापूरच्या विधानसभेचे उमेदवार राहतील अशी शक्यता असून पाटलांच्या उमेदवारीला शरद पवारांच्या जुन्या कार्यकर्त्यांनी व इच्छुकांनी विरोध दर्शविला आहे.

शरद पवारांची भेट घेण्यासाठी इंदापुरातून इच्छुक उमेदवार जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने, पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांसह अन्य कार्यकर्ते पुण्याला रवाना झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं ते त्या ठिकाणी मांडणार आहे. आता या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow