लासुर्णेच्या आठवडे बाजारातून शेळ्या चोरणारे वालचंनगर पोलीसांकडून अवघ्या काही तासात जेरबंद 

Dec 23, 2023 - 20:54
Dec 23, 2023 - 20:59
 0  1476
लासुर्णेच्या आठवडे बाजारातून शेळ्या चोरणारे वालचंनगर पोलीसांकडून अवघ्या काही तासात जेरबंद 

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील आठवडे बाजारातून 87 हजार रुपये किमतीच्या सात शेळ्या व एक मेंढी चार चाकी कार मधून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली होती.श्रीमती इंदुबाई हिरा खोमणे व सोमनाथ ज्ञानदेव खोमणे रा. लासुर्णे ता. इंदापूर यांच्या फिर्यादीवरुन या संदर्भात वालचंदनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.वालचंदनगर पोलीसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात तिघांना ताब्यात घेत चोरीस गेलेला 87 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

दिपक शिवाजी गायकवाड रा शिरोली (पु) यादववाडी ता.हातकंणगले जि. कोल्हापुर,शिवानंद पांडुरंग कुंभार रा.नागळा पार्क ता.करवीर जि.कोल्हापुर आणि मंगेश वामन कोकाटे रा.शिरोली (पु) यादववाडी ता.हातकंणगले जि.कोल्हापुर अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नांवे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनी दि.21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचे हद्दीतील आठवडा बाजारातून श्रीमती इंदुबाई हिरा खोमणे यांच्या मालकीच्या 69 हजार रुपये किमतीच्या ५ शेळ्या व एक मेंढी आणि सोमनाथ ज्ञानदेव खोमणे यांच्या मालकीच्या 18 हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या संगणमताने चोरी केल्या व त्या शेळी मेंढी त्यांचे जवळील चार चाकी गाडीतून घेऊन ते फरार झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दिपक शिवाजी गायकवाड यावर यापूर्वी कोल्हापूर मधील करवीर पोलीस स्टेशन मध्ये चोरीसह अन्य मिळून सहा गुन्हे दाखल आहेत.तर शिवाजी पांडुरंग कुंभार याच्यावर याच पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,तपासी आधिकारी सहा.पो.उप.निरीक्षक पाटमास, पोलीस हवालदार बनसोडे, दादासाहेब डोईफोडे,पोलीस कॉन्स्टेबल जगताप, अमोल चितकुटे,ट्राफिक वॉर्डन वैभव साबळे व दीपक माने,अजित पवार यांनी केली आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow