इंदापुरातील माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सारिका मोरे बिनविरोध

Dec 23, 2023 - 18:33
 0  488
इंदापुरातील माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सारिका मोरे बिनविरोध

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सारिका बाळू मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर गावचे सरपंच मंगल बाळासाहेब व्यवहारे यांसह उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.

विद्यमान उपसरपंच लक्ष्मी अधिक गडदे यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला होता.यानंतर रिक्त जागी माळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच मंगल बाळासाहेब व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.ग्रामसेविका सुर्यवंशी यांनी सारिका मोरे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.उपसरपंच पदासाठी सारिका बाळू मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब व्यवहारे,तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय रायकर,माधव मोरे,माजी सरपंच नागनाथ व्यवहारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक रायकर,राष्ट्रवादी विद्यार्थी युवकचे अध्यक्ष सागर व्यवहारे, अतुल शिंदे,गोकुळ व्यवहारे,मदन व्यवहारे,अशोक जाधव सतीश मोरे,विकास जाधव,शिवराज ढावरे,दादा गुंडेकर व सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow